जव्हार : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. आयुक्त, कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, नवी मुंबई व संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या सूचनेनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ४ या कालावधीत बारावी पास/ आयटीआय पदवीकाधारक/पदवी पदव्युत्तर उमदेवारांकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
जव्हार येथील आयटीआयमध्ये प्रशिक्षण मेळावा
