
मुंबई: तज्ञांच्या मते घरात अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात घाण असते. रिमोट, मोबाईल, चॉपिंग बोर्डसारख्या गोष्टींवर टॉयलेट सीटपेक्षाही अधिक बॅक्टेरिया असतात.
कटिंग बोर्ड
कटिंग अथवा चॉपिंग बोर्डावर सर्वाधिक किटाणू असतात. ही वस्तू खाण्याशी अधिक संबंधित असता. त्यामुळे फंगस आणि बॅक्टेरिया जमा होण्याचा धोकाही अधिक असतो. त्यामुळे कटिंग बोर्ड नियमितपणे साफ करत राहा आणि चांगला सुकवा.
रिमोट
टीव्ही, गेम्ससाठी रिमोट खूप उपयोगाचा असतो. प्रत्येक घरात रिमोट आढळतो. अनेकदा खाता-पिताना रिमोटला हात लावला जातो. यामुळे रिमोटवर बॅक्टेरिया जमा होतात. जे सहजरित्या आपल्या शरीरात पोहोचतात. यामुळे रिमोट नियमितपणे साफ करत राहा.
स्मार्टफोन
आजकाल चोवीस तास प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. रात्रंदिवस, झोपताना उठताना मोबाईलमध्ये असतात. एका स्टडीनुसार मोबाईलमध्ये टॉयलेट सीटच्या तुलनेत १० पटीने अधिक घाण असते. मात्र अनेकजण याला साफ करत नाही. यामुळे हे बॅक्टेरिया स्क्रीनवर येतात आणि नुकसान करतात.
पाण्याची बाटली, दरवाजाचे हँडल
याशिवाय पाण्याची बाटली, दरवाजाचे हँडल, लाईट अथवा फॅनचा स्विच, फ्रीजचा हँडल, बेड अथवा बेडशीट यावर सर्वाधिक घाण असते. यामुळे आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा साफ केले गेले पाहिजेत.