Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीमोठी बातमी! राज्यामधील १४ आयटीआय चे नामांतर; महाविद्यालयांना आनंद दिघें अन् विनायक...

मोठी बातमी! राज्यामधील १४ आयटीआय चे नामांतर; महाविद्यालयांना आनंद दिघें अन् विनायक मेटेचं नाव

मुंबई : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयामध्ये पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यामधील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त राज्यातील विविध जिल्ह्यात असलेल्या १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय यांचे नामांतर करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. त्यानुसार, या महाविद्यालयांना महापुरुषांचे व संबंधित जिल्ह्यात योगदान दिलेल्या व्यक्तींचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने १४ आयटीआय यांचे नामांतर करुन १४ महान व्यक्तींची नावेदेखील या आयटीआय संस्थेसाठी दिली आहेत. त्यामध्ये, ठाणे जिल्ह्यातील आयटीआयला (ITI) धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्यात आलं आहे. तर, बीडमधील (Beed) आयटीआयला दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं नाव देण्यात आलं आहे.

राज्य मंत्रिमंडलळाच्या बैठकीत राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या खात्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या आयटीआय कॉलेजेसला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याचं दिसून येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हा असलेल्या ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्यात आलं आहे. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या एल्फिन्स्टनमधल्या महाविद्यालयातील आयटीआयला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्यात आले आहे. राजर्षि शाहू महाराजांचे कोल्हापूरच्या आयटीआयला देण्यात आलंय तर बीडच्या आयटीआयला विनायक मेटेंचे नाव देण्यात आलं आहे.

नेमकं कोणत्या आयटीआयला कुणाचं नाव?

सध्याची नावे –                                                       नव्याने करावयाचे नामकरण

०१. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

०२ . औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे – धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

०३. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

०४. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड – कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

०५. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर. – भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

०६. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि.नाशिक – पालघर महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

०७. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर – राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

०८. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती – संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती.

०९. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

१०. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव – कवयत्री बहिणाबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव.

११. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा – दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा.

१२. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.- दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.

१३. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई. – महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई.

१४. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव – आचार्य विदयासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -