Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीNitesh Rane : काहीही घोषणा देण्यासाठी मुंबई म्हणजे तुमच्या आप्पाचा पाकिस्तान नाही!

Nitesh Rane : काहीही घोषणा देण्यासाठी मुंबई म्हणजे तुमच्या आप्पाचा पाकिस्तान नाही!

रॅली काढून नौटंकी करणाऱ्यांच्या हातात तिरंगा शोभत नाही!

आमदार नितेश राणे यांनी जिहादी लोकांना फटकारले

मुंबई : मुंबईत गणेश चतुर्थीनंतर मोहम्मद पैगंबराच्या वाढदिवसानिमित्त जिहादीचे लोकांनी जमून मुंबईत रॅली काढली होती. मात्र त्या रॅलीत जिहादी लोकांनी पॅलिस्टाईनचे झेंडे फडकवले, ‘सर तनसे जुदा’ हे नारे दिले तसेच हिंदुंच्या विरोधात आई-बहिणींवर घाणेरड्या घोषणा दिल्या. त्यावर भाजपा पक्षाचे आमदार आणि हिंदु धर्म रक्षक नितेश राणे (Nitesh Rane) यांनी घणाघात केला आहे.

मुंबईत जिहादीच्या निघालेल्या रॅलीने ज्या ठिकाणी ९० टक्के हिंदू लोक राहतात त्याठिकाणी पॅलिस्टाईनचे झेंडे कसे फडकवले गेले? ‘सर तनसे जुदा’ हे नारे कसे दिले? हिंदुंच्या विरोधात आई-बहिणीवर घाणेरड्या घोषणा कशा दिल्या? मंदिरांच्या बाहेर जोर-जोरात डीजे कसे लावले? जिहादी जर संविधानाला मानत असतील तर या भारत देशामध्ये ‘सर तनसे जुदा’ या घोषणा कशा लागतात. म्हणून आज मुंबईत जे जिहादी जमलेले आहेत त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे म्हणत नितेश राणे यांनी जिहादींवर टिकास्त्र सोडले.

जिहादी लोकांनी आधी भगवद् गीता वाचावी

जिहादी लोकांच्या हातात संविधान चांगलं दिसत नाही. जिहादींनी मुंबईत काढलेल्या रॅलीत हातात तिरंगा घेऊन केवळ नाटक आणि नौटंकी केली. या लोकांनी वेळेत भगवद् गीताचे चार-दहा पानं वाचली असती तर त्यांच्यावर आज ही रॅली काढण्याची परिस्थिती आली नसती. परमपुज्य रामगिरे महाराज आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते हिंदुंची बाजू लावून धरत आहेत. ते इतर कोणत्याही अन्य धर्माला बोलत नाही. पण अशावेळी तुम्ही हिंदुंना अंगावर घेत असाल तर ते देखील तुम्हाला शिंगांवर घेतील, असे म्हणत नितेश राणे यांनी जिहादी लोकांना फटकावले.

जिहादींनी संविधानाच्या विषयावर काहीच बोलू नये

संविधानामध्ये सर्व धर्मांना योग्य सन्मान देणं हेच लिहिले आहे. तरीही जिहादी लोकांनी गणेशचतुर्थीच्या मिरवणुकीवर मशिदीतून दगडफेक झाली त्याप्रकरणावर निषेध केला नाही, त्यामुळे जिहादींनी संविधानाच्या विषयावर काहीच बोलू नये. मुंबईत रॅली काढून हिंदूना डिवचणं आणि त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न होत असेल, तर हिंदूही एकत्र येऊन आपली ताकद दाखवू शकतात. असे झाल्यास मुंबई देखील कमी पडेल. म्हणून राज्यात जिहादी वाल्यांचे लाड कोणीही करणार नाही. रामगिरी महाराज यांनी बोलल्याप्रमाणे झाकीर नाईकसह इतर मुस्लिम धर्मातील अनेक लोकही बोलले होते. त्यामुळे सर्वात आधी त्या झाकीर नाईकचा सर तनसे जुदा करा त्यानंतर रामगिरी महाराजांकडे वाकड्या नजरेने बोट दाखवा, असे बोलत नितेश राणे यांनी जिहादी लोकांना चांगलाच चाप दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -