मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भले आयपीएलमध्ये आता चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार नाही मात्र त्याचे फॅन फॉलोईंगची संख्या काही कमी नाही. आजही त्याचे मोठ्या प्रमाणात चाहते स्टेडियममध्ये आहेत. धोनी नेहमीच आपल्या कोणत्या ना कोणत्या निर्णयाने चाहत्यांची मने जिंकत असतात. यातच आता अशी बातमी येत आहे की ज्यामुळे महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
यात कोणतीच शंका नाही की धोनीच्या मनात चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझीसाठी एक खास जागा आहे. त्याने अनेकदा हे जाहीरही केले आहे. पुन्हा एकदा धोनीने संघासाठी मोठा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार धोनी आयपीएल २०२५साठी चेन्नई सुपर किंग्सकडून केवळ ६ कोटी रूपये घेणार आहे.
या खेळाडूंना रिटेन करू शकते चेन्नई सुपर किंग्स
रिपोर्टनुसार चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२५ साठी रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि मथीषा पथिराना यांना रिटेन करू शकते. दरम्यान धोनीला एका अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन केल्यास हे होईल.