Sunday, October 6, 2024
Homeदेशभारत आता संधी शोधत नाही तर निर्माण करतो- पंतप्रधान मोदी

भारत आता संधी शोधत नाही तर निर्माण करतो- पंतप्रधान मोदी

न्यूयॉर्क: अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी २२ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केले. न्यूयॉर्कच्या नासाऊ वेटरंस कॉलेजियममध्ये पोहोचल्यानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या गर्दीने पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यानंतर अमेरिका आणि भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले.

भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आपला नमस्ते मल्टीनॅशनल झाला आहे. नॅशनलवरून ग्लोबल झाला आहे.

मोदींच्या भाषणातील मुद्दे

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, आज भारताचे ५जी मार्केट अमेरिकेपेक्षाही मोठे झाले आहे. हे केवळ दोन वर्षांच्या आत घडले. आता भारत मेड इन इंडिया ६जीवर काम करत आहे. भारत आता थांबणार नाही. भारताला वाटते जगातील सर्वाधिक डिव्हाईस मेड इन इंडिया चिपवर चालावेत. एक काळ होतो जेव्हा आम्ही मोबाईल आयात करत होतो आता मोबाईल निर्यातदार देश बनलो आहोत. आता भारत नवी अर्थव्यवस्था बनत आहे. आता भारत नेतृत्व करतो.

भारताच्या इकॉनॉमीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, एक दशकापासून भारत १०व्या स्थानावरून ५व्या स्थानावरील इकॉनॉमी बनला आहे. आता प्रत्येक भारतीयाला वाटत आहे की त्यांनी तिसऱ्या स्थानावर यावे. येथे संधी निर्माण होत आहे. आता संधींची वाट पाहावी लागत नाही तर संधी निर्माण होतात. भारत एनर्जीने भरलेला आहे.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात एआयचा अर्थ समजावला. ते म्हणाले जगासाठी एआयचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आहे. मात्र माझ्यामते एआयचा अर्थ अमेरिकन इंडियन आहे. हीच जगाची पॉवर आहे. हेच एआय स्पिरिट भारत-अमेरिकेच्या नात्याला नवी उंची गाठून देईल.

अमेरिकेतली भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सेमीकंडक्टर क्षेत्राबद्दलही सांगितले. ते म्हणाले, गेल्या जूनमध्ये भारताने सेमी कंडक्टर सेक्टरसाठी इन्सेटिव्ह घोषित केले होते. यानंतर काही महिन्यांमध्ये मायक्रोनच्या पहिल्या सेमी कंडक्टर युनिटचा शिलान्यास झाला आहे. भारतात भारतात अशा पाच युनिट्सना परवानगी मिळाली आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही मेड इन इंडिया चिप अमेरिकेतही पाहाल.

गेल्या १० वर्षांमध्ये प्रत्येत आठवड्याला एक युनिर्व्हसिटी बनत आहे. दरदिवशी नवे कॉलेज येत आहे. प्रत्येक दिवशी एका नव्या आयटीआयची स्थापना झाली आहे. १० वर्षात मेडिकल कॉलेजची संख्या दुप्पट झाली आहे.

आम्ही ग्लोबल साऊथचा एख मजबूत आवाज आहोत. आज भारत ग्लोबल प्लॅटफॉर्मवर जर काही करतो तर जग ते ऐकते. मी जेव्हा म्हटले की हे युद्धाचे युग नाही तेव्हा त्याचे गांभीर्य सर्वांनी समजले. आज जगात कुठेही गंभीर संकट आले तर भारत फर्स्ट डिफेंडर म्हणून समोर जातो. कोरोनाकाळात आम्ही १५०हून अधिक देशांना लस आणि औषधे पाठवली.

आता काही दिवसांपूर्वी पॅरिस ऑलिम्पिक संपले. पुढील ऑलिम्पिकचे यजमानपद यूएसए करत आहे. लवकरच भारतात तुम्हाला ऑलिम्पिक दिसतील. आम्ही २०३६च्या ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करत आहोत.

अमेरिका आणि भारतात यांच्यातील भागीदारी मजबूत होत आहे. आम्ही भागीदारी भले जागतिक भल्यासाठी आहे आणि आम्ही प्रत्येक क्षेत्रात सहकार वाढवत आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात भारत सरकारच्या पॉलिसीबद्दलही माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही प्रत्येक सेक्टरसाठी बढावा देण्यासाठी पॉलिसी बनवली आहे. सर्वात स्वस्त डेटावर काम केले. आज जगातील प्रत्येक मोठा मोबाईल ब्रांड मेड इन इंडिया आहे. तुमच्या खिशात पाकीट आहे मात्र भारतात लोकांकडे इ वॉलेट आहे. भारतातील लोकांकडे डिजी लॉकर आहे. भारत आता थांबणार नाही.

मोदींनी आपल्या संबोधनात सांगितले की पुष्पच्या पाच पाकळ्या मिळून विकसित भारत बनवू ते म्हणाले, PUSHP… P For Progressive भारत, U For Unstoppable भारत. S For Spiritual भारत, H For Humanity First ला समर्पित भारत, P For Prosperous भारत. PUSHP- पाच पाकळ्या मिळून विकसित भारत बनवणार आहोत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -