दीपक मोहिते
मुंबई : महायुतीचे नेते एकीकडे विविध योजनेच्या माध्यमातून पैश्याची खिरापत वाटत असताना दुसरीकडे शरद पवार यांनी त्यांच्या पायाखालची चादर ओढण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी लिहिलेल्या लेखात महायुतीचे अनेक नेते शरद पवार यांच्या “सिल्व्हर ओक” या निवासस्थानी प्रवेशासाठी रांगेत उभे असल्याचे म्हंटले होते. आज त्या नेत्यांची यादी आमच्या हाती लागली आहे. पण शरद पवार हे प्रवेश देताना आता ताक देखील फुंकून पीत आहेत. या रांगेत कोण कोण उभे आहेत,यावर एक नजर टाकूया.
- विवेक कोल्हे – कोपरगाव
- बाळ भेंगडे – मावळ
- बाबू पठारे – वडगाव शेरी
- हर्षवर्धन पाटील – इंदापूर
- मदन भोसले – वाई
- प्रशांत परिचारक – पंढरपूर
- राजन पाटील – मोहोळ
- दिलीप सोपल – बार्शी
- रणजित शिंदे – माढा
- गणेश नाईक – नवी मुंबई
- रमेश कदम – मोहोळ
- रामराजे निंबाळकर – फलटण
या व्यतीरिक्त २२ ते २३ असे एकूण ४२ ते ४५ जण रांगेत उभे आहेत.तसेच पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्याही गगनाला पोहोचली आहे.पक्षाकडे एकूण ६१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.पवार यांच्या सांगण्यावरून ३० ते ४० जागांवर संभाव्य उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या निवडणुकीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडे ८० जागा मागितल्या आहेत व त्यांना त्या मिळतील. शरद पवार यांच्या पक्षात सुरू असलेले इनकमिंग पाहून महायुतीच्या नेत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचे दोन मोठे नेते त्यांच्या गोटात सामील होणार आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर महायुतीच्या नेत्यांचे उरले सुरले अवसान देखील गळून पडणार आहे. चिपळूण येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अनेक जण पक्षात सामील झाले. तसेच पालघर जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटातील काही महिला पदाधिकारी देखील त्याच वाटेवर आहेत.