Sunday, August 31, 2025

Airtel युजर्ससाठी खुशखबर, लाँच झाले ३ स्वस्त डेटा प्लान्स

Airtel युजर्ससाठी खुशखबर, लाँच झाले ३ स्वस्त डेटा प्लान्स

मुंबई: एअरटेलने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी ३ नवे प्लान्स लाँच केले आहेत. हे तीनही प्लान्स डेटा वाऊचर्स प्लान्स आहेत. या प्लान्समध्ये तुम्हाला डेटा बेनेफिट्स मिळतील. हे डेटा अॅडऑन प्लान्स नाहीत कारण या तीन नव्या डेटा वाऊचर प्लान्ससोबत तुम्हाला व्हॅलिडिटीही मिळेल. जाणून घ्या एअरटेलच्या तीन नव्या प्लान्सबद्दल...

एअरटेलने हे तीनही प्लान्स १६१ रूपये, १८१ रूपये आणि ३५१ रूपयांचे आहेत. या तीन प्लान्ससोबत युजर्सला ३० दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. या प्लानमध्ये युजर्सला फ्री एसएमएस अथवा कॉलिंगशी संबंधित कोणतीही सुविधा मिळत नाहीत.

एअरटेल १६१ रूपयांचा प्लान

एअरटेलद्वारे लाँच केलेल्या नव्या डेटा वाऊचर्स प्लान्सच्या लिस्टमध्ये पहिल्या एअरटेलचा हा प्लान आहे. याची किंमत १६१ रूपये आहे. या प्लानसोबत तुम्हाला १२ जीबी डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी ३० दिवसांची असेल.

एअरटेल १८१ रूपयांचा प्लान

एअरटेलकडून लाँच करण्यात आलेल्या नव्या डेटा वाऊचर्स प्लान्सच्या यादीत दुसऱ्या स्थानावर हा प्लान आहे. याची किंमत १८१ रूपये आहे. या प्लानसोबत १५ जीबी डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी ३० दिवसांची असेल.

एअरटेल ३६१ रूपयांचा प्लान

एअरटेलकडून लाँच केल्या गेलेल्या डेटा वाऊचर्स प्लान्सच्या यादीत तिसऱ्या स्थानावर हा प्लान आहे. याची किंमत ३६१ रूपये आहे. या प्लानसोबत ५० जीबी डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी ३० दिवसांची असेल.

Comments
Add Comment