Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai News : मुंबईकरांनो लक्ष द्या! आज वांद्रे-कुर्ला परिसरातील अनेक मार्ग बंद;...

Mumbai News : मुंबईकरांनो लक्ष द्या! आज वांद्रे-कुर्ला परिसरातील अनेक मार्ग बंद; ‘हे’ असतील पर्यायी मार्ग

जाणून घ्या नेमके कारण काय?

मुंबई : मुंबईत (Mumbai) फ्लोरा फाऊंटन येथे बांधण्यात आलेली मुंबई उच्च न्यायालयाची (Bombay High Court) भव्य इमारतीला काळानुरूप पायाभूत सुविधांनी आणखी भक्कम केले पाहिजे, यासाठी वांद्रे (Bandra) पूर्व, मुंबई येथे मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुल बांधण्यात येत आहे. या जागेवर बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड (D.Y. Chandrachud) अनावरण केले जाणार आहे. मात्र या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक मार्ग बंद राहणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा आज खोळंबा होण्याची शक्यता असून नागरिकांनी आज बाहेर पडताना योग्य वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज होणाऱ्या कार्यक्रमावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे. त्यानुसार आज कार्यक्रमादरम्यान प्रमुख रस्ते बंद करुन पर्यायी मार्गाची सोय करण्यात आली आहे.

कोणता मार्ग बंद?

मुंबई वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, रामकृष्ण परमहंस मार्ग (Ramkrishna Paramhansa Marg) आणि जेएल शिर्सेकर मार्ग (J. L. Shirsekar Marg) यांना जोडणारा न्यू इंग्लिश स्कूल रोड बंद केला जाणार आहे. मात्र कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी सदर रस्ता वापरण्याची परवानगी आहे.

पर्यायी मार्ग कोणते?

वाहनचालकांना महात्मा गांधी विद्या मंदिर रोडचा वापर (Mahatma Gandhi Vidya Mandir road) करता येणार आहेत. दरम्यान रात्री ९ नंतर या मार्गावरील नियमित वाहतूक सुरू होणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.

या दिग्गजांची प्रमुख उपस्थिती

कोनशिला अनावरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई, न्यायमूर्ती ए.एस.ओक, न्यायमुर्ती दीपंकर दत्ता, न्यायमूर्ती उज्वल भुयान आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय उपस्थित राहणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -