पुणे : पुणे-बेंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी सूचविलेल्या उपाययोजनांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दर्शविला असून तातडीने ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास तत्वत: मान्यता दिल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुणे-बेंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी हा सध्याचा गंभीर विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी वाहतूक पोलिसांशी चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्याबाबत सूचना केली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अंशुमाळी श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम, महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, महापालिकेचे वाहतूक नियोजनकार निखिल मिजार, आर्किटेक्ट (मेटा आर्च) मिलिंद रोडे यांच्यासह इतर सहकाऱ्यांसमवेत आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तयार केला.
अतिरिक्त पोलिस आयुक्त पाटील यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर शनिवारी या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. गडकरी यांनी या सादरीकरणाचे कौतुक करत तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे वाहतूक पोलिसांना एकत्र बैठक घेण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत करावयाच्या उपाययोजनांबाबत दोन्ही यंत्रणांनी कृती आराखडा तयार केला असून त्याला गडकरी यांनी ३०० कोटी रुपयांच्या खर्चास तत्वत: मान्यता दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षात सुमारे २० लाख वाहनांची वाढ झाली आहे म्हणजेच पुण्यात २०१८ मध्ये वाहनसंख्या ५२ लाख होती, ती २०२४ मध्ये ७२ लाखांपर्यंत पोहोचली आहे. दररोज १३०० नवीन वाहनांची भर पडते, त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. पुण्याला नसणारे रिंग रोड नसल्याने पुणे-बेंगळुरू रस्त्याचा वापर रिंग रोड म्हणून करण्यात येतो.गेल्या तीस वर्षात नऱ्हे, धायरी, नांदेड सिटी, उत्तमनगर, भूगाव, पिरंगुट, सूस, बाणेर, म्हाळुंगे, हिंजवडी, आणि किवळे या भागांमध्ये साधारणतः १० लाखांपेक्षा जास्त नागरीक वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे या दक्षिण भागामध्ये आयटी पार्क विशेषतः हिंजवडीसह अनेक औद्योगिक व शैक्षणिक संस्था झालेल्या आहेत.दररोज साधारण २ ते ३ लाख नागरिक हायवेचा वापर करतात. तर, पिक हवर्सला १५ ते २५ हजार लोक या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्यावर गेल्या तीन वर्षात १०० पेक्षा अधिक अपघात झालेले असून त्यामध्ये ६८ लोकांनी जीव गमावलेला आहे व ५४ लोक गंभीर जखमी झालेले आहेत.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…