Tuesday, March 18, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPM Narendra Modi : पुण्यात 'या' तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते होणार अंडरग्राउंड मेट्रोचे...

PM Narendra Modi : पुण्यात ‘या’ तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते होणार अंडरग्राउंड मेट्रोचे उद्घाटन!

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) २६ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्याच्या (Pune News) नवीन भूमिगत मेट्रो (Metro) मार्गाचे उद्घाटन करतील. दिवाणी न्यायालय ते स्वारगेटपर्यंत धावणाऱ्या या मेट्रो मार्गामुळे शहराच्या कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. याबरोबर या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी दोन मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी करतील. यामध्ये स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचा विस्तार आणि पिंपरी चिंचवड ते निगडी असा कॉरिडॉर यांचा समावेश आहे.

या दोन्ही नव्या प्रकल्पांमुळे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आणखी सुधारणा होणार आहे. यासह पुणेकरांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे.

नवीन भूमिगत मेट्रो मार्गामध्ये आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाठी अनेक आधुनिक सुविधांचा समावेश आहे. यात आधुनिक स्थानके, सुरक्षा आणि आरामदायी प्रवास यांचा समावेश आहे.

दिवाणी न्यायालय ते स्वारगेट मार्गावरील भूमिगत मेट्रो ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित आहेत. तसेच मेट्रोची रचना प्रत्येक प्रवाशाला लक्षात घेऊन केली गेली आहे, ज्यामध्ये रॅम्प आणि दिव्यांग प्रवाशांसाठी वेगळ्या जागेची व्यवस्था केली आहे. याचबरोबर पुण्यातील हा नवा मेट्रो मार्ग पूर्णपणे इको-फ्रेंडली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -