ॲमेझॉनची गुढगाथा (भाग ९)

Share

निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

आज आपण ॲमेझॉनच्या प्राण्यांच्या राज्यात जाऊ या. येथे थोडीशी नाही तर चांगलीच भीती वाटणार आहे असे भयंकर प्राणी तर आहेतच पण लाजरे-बुजरे, मवाळ, प्रेमळसुद्धा आहेत. ॲमेझॉन जंगल म्हणजे मानव सोडून इतर जीवसृष्टीचा सुरक्षित खजाना. येथील जैवविविधतेत इतर जीवांबरोबर प्राण्यांची संख्यासुद्धा भरपूर आहे. कमीत कमी ४३० स्तनधारी प्रजाती आहेत. येथे सरपटणारे अनेक जीव आहेत. विविध प्रकारचे गोमी, उंदीर, साप, बेडूक, सरडे ज्ञात-अज्ञात असे अनेक प्राणी येथे आढळतात.

एक महत्त्वाची गोष्ट जे नऊ देश एकत्रितपणे या जंगलाच्या सीमेवर आले आहेत त्या प्रत्येक देशाकडील भागात विविध सजीव सृष्टीची भरमारच आहे. अमेरिकेच्या जंगलात जॅग्वार तर आफ्रिकेच्या दिशेला चित्ते दिसतात. ॲमेझॉनमध्ये असणाऱ्या विशाल नदीत आपल्याला उदबिलाव हा प्राणी अगदी मुक्तपणे संचार करताना दिसतो. ५.६ लांबी, मजबूत शेपूट आणि जाळीचे पाय याचा उपयोग करून हे नदीमध्ये सतत पोहत असतात. यांचे उच्चार यांचा ध्वनी कमीत कमी २२ प्रकारचा असतो. पेरूच्या जंगलात हा उलर माकड याचा आवाज तर तुम्ही पाच किलोमीटर वरूनच ऐकू शकता.

वर्षा वनातील छत्री या भागात ही माकडे जास्त दिसून येतात. दाढीवाला सम्राट तामारीन चार ते पंधरा एवढ्या कुटुंबात राहणारे एक पांढरी दाढी मिशी असणारे, मोठ्या डोळ्यांची माकडांची एक जात. सिंहासारखी आयाळ असणारे पिवळट सोनेरी रंगाचे गोल्डन लायन टर्मरिन. एक माकड तर अगदी खारीसारखे दिसते. अगदी टोपीवाले, मोठी मिशीवाले अशी विविध प्रकारची माकडे इथे दिसतात. काळ्या टोपीचे खारीसारखे दिसणारे माकड हे जवळजवळ ४०-५० च्या झुंडीत नर मादी मिळून राहतात. हे झाडावर चढताना त्यांचे संतुलन राहावे म्हणून त्यांच्या शेपटीचा वापर करतात. कैपीबारा गिनीपिग सारखा दिसणारा अगदी शांत प्राणी आहे. हा गोड पाण्याजवळ दक्षिण अमेरिकेतील भागात राहतो. हे उत्तम पोहणारे असून पाच मिनिटांपर्यंत ते श्वास धरून पाण्याखाली पोहू शकतात. डुकरासारखे दिसणारे टैपिर. घोडा आणि गेंड्याच्या मिश्रणाचे वाटणारे उत्तम पोहणारे. यांच्या अंगावर पांढऱ्या रेषा असतात; परंतु कालांतराने त्या नाहीशा होतात.

स्लाॅथ प्राणी तुम्हाला माहितीच असेल. स्लॉथचा अर्थ स्पॅनिशमध्ये आळशी असा होतो. पूर्ण अंग केसांनी झाकलेले, रंगाने तपकिरी किंवा राखाडी काळपट, चेहऱ्यावर हावभाव नसणारा, संथगतीने चालणारा, अत्यंत अवजड वाटणारा असा हा केसाळ प्राणी. झाडांची पाने खाणारा, ओंगळ वाटणारा, थोडा विचित्र वाटणारा पण अत्यंत निरूपद्रवी असा हा स्लाॅथ. स्लाॅथचा रंग हा झाडांच्या खोडासारखा तर कधी पानांसारखा असतो. या जंगलात दोन आणि तीन बोटांचे स्लॉथ आपल्याला आढळतात. हा इतका आळशी असतो की, शत्रूंनी हल्ला केला तरी हा जागेवरून लवकर हलत नाही. कॉलर वाला चिंटीखोर हा १५ इंच लांब जीव असणारा मुंग्या आणि वाळवी खाण्यासाठी शोधक नजरेने सतत झाडावर फिरणारा जो दक्षिण अमेरिकेकडे जंगलात आपल्याला आढळतो. प्यूमा नजरेस पडणे म्हणजे आपल्यासाठी भाग्यच म्हणावे लागेल; परंतु हा गेल्या वीस वर्षांत येथील जंगलात नजरेस पडलाच नाही.

येथे ४०० पेक्षा जास्त उभयचर प्राणी आणि ३७५ पेक्षा जास्त सरपटणारे प्राणी आहेत. विषारी आणि बिनविषारी. जेवढे विषारी असतात तेवढी त्यांच्या अंगावर गर्द रंगाची पोतयुक्त नक्षी असते. हे अध्ययनांतर्गत लक्षात येते. नैसर्गिक रचना अशी आहे की, या सुंदर परंतु गर्द, आकर्षक, चमकदार दिसणाऱ्या जीवांपासून इतर जीवांनी लांब राहावे म्हणून हे नैसर्गिक रक्षा कवच त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा आहे.

विषारी डार्ट बेडूक, दोन रंग असणारा वृक्ष बेडूक, ट्रिपल लाल डोळ्याचा बेडूक, दुधाळ बेडूक असे अनेक प्रकारचे बेडूक येथे आढळतात. वृक्ष बेडूक या बेडकाची गंमतच आहे. तो अगदी झाडांच्या हिरव्या चमकत्या रंगांचा असतो. म्हणजे खोडाच्या रंगाचे पोट आणि पानांच्या रंगाचे वरचे सर्व शरीर जो कायम झाडांवरच दिसतो. अक्षरशः माकडासारखे झाडांवर झुलणे, उड्या मारणे असे करतो. निळ्या रंगाचा बेडूक हा एवढा विषारी असतो की, एका वेळेला तो दहा जणांना विषबाधा करू शकतो. ग्लास बेडूक जो पारदर्शक असतो आणि त्याच्या शरीरातील सगळे अवयव आपल्याला दिसतात. साईड नेक्डं कासव याच्याबद्दल असे म्हणतात की, यांच्या आसपास सतत फुलपाखरे फिरत असतात आणि यांच्या डोळ्यांतील अश्रू पीत असतात. कारण येथील जंगलात त्यांना मिठाची पूर्तता होत नसल्यामुळे ती पूर्तता ते कासवांच्या अश्रूंमधून करतात.

अत्यंत आकर्षक असे गुलाबी डॉल्फिन हा इक्विटोस येथील नदीत आढळतो. यांच्याबद्दल अनेक दंतकथा आहेत. हे गुलाबी डॉल्फिन येथील जंगली स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी रात्री पुरुष बनून येतात असे म्हणतात. ८६० व्होल्टचा झटका देणारा इलेक्ट्रिक ईल हा मासा तर स्वतःपेक्षा कितीही मोठा प्राणी असला तरी तो एका झटक्यात मारतो. पिरान्हा हा मासा जास्तीत जास्त दोन फुटांपर्यंतचा ॲमेझॉनमध्ये आढळून येतो. हे शिकारीवर झुंडीने हल्ला करतात. यांनी माणसे खाल्ल्याचेही ऐकिवात आहे.

ॲनाकोंडाच्या पाच प्रजाती आढळतात. सर्वात मोठा ॲनाकोंडा अमेझॉनमध्ये आढळतो. हिरवा ॲनाकोंडा हा जगातील सर्वात मोठा सर्प जो दलदलीत नदीत आढळतो. हा जमिनीवर क्वचितच असतो. हे चलाख शिकारी असतात. तो मासे, बेडूक यांचा अगदी निष्णात शिकारी आहे. काही ॲनाकोंडा विषारी नसतात पण ते त्यांच्या शिकारीला दाबून मारू शकतात. पाण्यात असणारा ॲनाकोंडा हा सुद्धा मगरी सारखाच पाण्याच्या वर थोडेसे तोंड काढून शरीरात उष्णता साठवून उष्णतेचे संतुलन करतो. याची चमकणारी आकर्षक त्वचा पोतयुक्त, विविधरंगी असते.

येथील मांजरीसुद्धा वाघांसारख्या पोतयुक्त आहेत. कॅपीबारा हा एक मोठा उंदीर आहे. इथे लहान, मोठी उंदरं, मोठ्या घुशी मोठ्या प्रमाणात आहेत. एक साऊथ अमेरिकन कोआटी हे डुक्कर आणि कुत्र्याचे मिश्रण असणारा प्राणी सुद्धा पाहायला मिळतो.

निसर्गचक्राचे संतुलन त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणारे हे जीव. आजपर्यंत सर्व विश्वाला २० टक्के ऑक्सिजन मिळत असेल तर ते फक्त आणि फक्त या सजीव सृष्टीमुळेच. या अमेझॉनच्या जंगलात कोणतीही ढवळाढवळ न करता मानवाने लांब राहिलेलेच बरे.

dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com

Tags: Amazon saga

Recent Posts

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

14 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

19 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

48 minutes ago

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

1 hour ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

1 hour ago