मुंबई : मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव (साहित्य शाखा) व सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल (कार्यक्षेत्र महाराष्ट्र)यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २१सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २:०० ते ५:०० या वेळेत निमंत्रितांच्या हास्य कविसंमेलन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी तर सूत्रसंचालन मनोज वराडे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव, साहित्य शाखेचे कार्यवाह श्री. अशोक बेंडखळे, उपाध्यक्ष डॉ. उज्वला मेहेंदळे, शब्दवेल सचिव अश्विनी अतकरे, खजिनदार देवेंद्र इंगळकर उपस्थित होते.
या कविसंमेलनामध्ये नितीन वरणकार(शेगाव-बुलढाणा), प्रा. संजय कावरे (मंगरूळपीर-वाशिम), प्रवीण सोनोने (दारव्हा-यवतमाळ), प्रा.महादेव लुले(तिवसा-अकोला), अमोल चरडे(पुणे), प्रवीण बोपुलकर (पनवेल) हे कवी आपल्या कविता सादर केल्या. याप्रसंगी महाराष्ट्राचा हास्य कवी स्पर्धा २०२४ या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम सुद्धा पार पडला. यामध्ये प्रथम श्रीराम घडे,परभणी मेहुणीची आरती), द्वितीय क्रमांक- अजय माटे,खामगाव (गूड मॉर्निग पथक), तृतीय क्रमांक -पल्लवी चिंचोळकर,अडगाव (उद्यापासून सुरूवात करते) तर उत्तेजनार्थ क्रमांक आर. के. आठवले, छत्रपती संभाजीनगर (जांगडगुत्ता) रामदास गायधने,पनवेल (डावा डोया), चेतन सुरेश सकपाळ,विरार (खड्ड्याचे आभार), महेंद्र सूर्यवंशी,पनवेल (पडत जा तिच्या पाया), विशाल कुलट, अकोट (जुटीन काय भौ यंदा माय लगन), रुतुजा कुलकर्णी, (खिशातलं पाकीट चेक करायला हवं) ,नंदेश गावंड, अलिबाग (निराशा), अशोक मिरगे, अमरावती (माझी कोपरखळी), रविकिरण पराडकर, चेंबूर (पॉझिटिव्ह), सागर सोनवणे,बेलापूर (भाऊबीज) यांना प्राप्त झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रतिभा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली सहसचिव रामदास गायधने, संघटन प्रमुख नवनाथ माने, केंद्रिय प्रसिध्दी प्रमुख विलास पुंडले यांनी केले. आभार प्रदर्शन प्रतिभा विश्वास यांनी केले.
याप्रसंगी साहित्य संघाचे सदस्य एकनाथ आव्हाड, नाट्यशाखेचे कार्याध्यक्ष प्रमोद पवार, संघमंदिर कार्यवाह सुभाष भागवत, साहित्यिक शिवाजी गावडे, कमलाकर राऊत, मकरंद वांगणेकर, संजय पाटील, स्वाती गावडे, व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर, परशुराम रोतेले, सुरेश नागले, सु. पु. अढाऊकर, शिल्पा चऱ्हाटे यांच्याबरोबर महाराष्ट्रभरातल्या अनेक भागातून आलेले कवी आणि रसिक उपस्थित होते.