मुंबई : येत्या पितृ अमावस्येच्या (Pitru Amavasya) दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी यंदाच्या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण (Surya Grahan) लागलं जाणार आहे. त्यामुळे या सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. हे सूर्यग्रहण २ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी सुरु होणार आहे. तर ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजून १७ मिनिटांनी संपणार आहे. परंतु ज्योतिषशास्त्रांच्या अभ्यासानुसार, या वेळेचा सूर्यग्रहणाचा काळ अशुभ मानला जात आहे. काही राशींवर (zodiac signs) या सूर्यग्रहणाचा नकारात्मक प्रभाव पडणार असल्यामुळे त्या राशीतील लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.
कन्या (Virgo)
सूर्यग्रहणामुळे कन्या राशीच्या लोकांसोबत किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत अशी काही घटना घडण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना या काळात इजा होण्याची सर्वाधिक धोका आहे. कन्या राशीच्या लोकांनी वाहन चालवताना काळजी घेणे या काळात आवश्यक आहे.
तूळ (Libra)
तूळ राशीतील लोकांना सूर्यग्रहणाच्या या काळात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या काळात तूळ राशीतील व्यक्तीला कोताही आजार ग्रासला जाऊ शकतो. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच या लोकांना खाण्यापिण्याच्या सवयींबाबत देखील विशेष काळजी घ्यावी.
सिंह (Leo)
सिंह राशीच्या लोकांचे जोडीदार आजारी पडू शकतात. जर तुमची जीवनसाथी महिला असेल तर पोटाशी संबंधित समस्या आणि जर तुमचा जीवनसाथी पुरुष असेल तर तिच्या डोळ्यांना आणि उजव्या हाताला दुखापत होण्याचा दाट शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांनी आठव्या भावातील राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शंकराला गूळ आणि पाणी अर्पण करणे विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. भगवान शिवाच्या कृपेने राहूचा नकारात्मक प्रभाव संपणार आहे.
मीन (Pisces)
मीन राशीच्या लोकांना या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. हा रोग त्यांचे मित्र, जोडीदार आणि नातेवाईकांना त्रासदायक ठरणार आहे. त्यांचे आरोग्य खराब असणार आहे. अशा स्थितीत मीन राशीच्या लोकांनी सूर्यदेवाला समर्पित मंत्रांचा जप करावा लागणार आहे. भगवान शंकराला जल अर्पण केल्याने त्यांना त्रासातून मुक्ती मिळणार आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी ज्योतिष शास्त्रांच्या आधारे देण्यात आली आहे. ‘प्रहार’ या कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.)