Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीनवी मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! आता ठाणे-बेलापूर प्रवास होणार सुपरफास्ट

नवी मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! आता ठाणे-बेलापूर प्रवास होणार सुपरफास्ट

तयार होतोय नवा पूल; वाहतूक कोंडीतूनही सुटका

नवी मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात प्रशासनाकडून (Administration) अनेक विकासाची कामे हाती घेण्यात आली आहे. राज्यात मोठमोठ्या महामार्गांची कामे सुरू आहेत. मुंबई, नवी मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये विविध रस्ते विकासाच्या मोठ-मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुसाट होत असून वाहतूक कोंडीतून देखील सुटका होत आहे. अशातच आता नवी मुंबईकरांचाही (Navi Mumbai) ठाणे ते बेलापूर प्रवास जलद गतीने पार पडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेने ठाणे-बेलापूर रोडवरून कोपरखैरणे आणि घणसोलीपर्यंत पोहचण्यासाठी नवा पूल तयार करण्याची योजना आखली आहे. या योजनेद्वारे वाहन चालक टीबी रोडवरुन बेलापूर ते ठाण्याच्या दिशेला जाताना नोटवरून जाऊ शकणार आहेत. तसेच धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीसोबत (DAKC) टीबी रोडवरील उड्डाणपूलानंतर सुरू होणाऱ्या आर्म ब्रिजवरून जाऊन ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर जाऊ शकणार आहेत. यामुळे वाहनचालकांचा प्रवास अगदी सुखकर आणि सुसाट होणार आहे.

दरम्यान, या पूलासाठी तब्बल २४.२३ कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे. हा प्रोजेक्ट नोड्सवर वाहतूक प्रवाह सुलभ करण्यात मदत करेल.

सध्या कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळ फक्त एक अरुंद भुयारी मार्ग आहे ज्याचा वापर वाहनधारक कोपरखैरणे नोडमध्ये जाण्यासाठी करतात आणि टीबी रोडवरील ठाण्याकडे जाणाऱ्या गल्लीतून घणसोली गावाला जोडणारा जुना रस्त्याचा वापर करतात. मात्र यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आह. त्यामुळे एक आर्म ब्रिज बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. याबाबत निविदा मागवण्यात आल्या असून त्याचे सबमिशन महिना संपण्यापूर्वी कराव्या लागतात. त्यानंतर काम लवकरात लवकर काम पूर्ण केले जाईल, असे नवी मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता शिरीष अरदवाड यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -