साईबाबांच्या मुकुटांची संख्या १९ वर
शिर्डी : संपुर्ण विश्वाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणा-या आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी (Shirdi) येथील श्री साईबाबांच्या (Sai Baba) झोळीत दानशूर साईभक्तांकडून दान स्वरुपात देण्यात येणाऱ्या सोने,चांदी,रत्नजडित हिरे,रोख रक्कम यांसह मौल्यवान वस्तूंमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशविदेशातील भाविकांनी साईबाबांच्या शिरपेचात सोने, रत्नजडित हि-यांचे अंदाजे १८ मुकुट अर्पण केले आहे. रविवारी अज्ञात दानशूर साईभक्ताकडून ११० ग्रॅम ५७० मिली वजनाचा सुमारे १२ लाख ७० हजार रुपये किंमतीचा सुवर्ण हिरेजडित मुकुट साईचरणी अर्पण केला असून यामुळे सुवर्ण मुकुटांची संख्या एकूण १९ वर पोहचली आहे.
दरम्यान जगाला सर्वधर्मसमभावाची शिकवण देणा-या शिर्डी येथील श्री साईबाबांचा प्रचार व प्रसार वेगाने पसरत आहे. देशविदेशात साईबाबांचे हजारांहून अधिक मंदिरे असून करोडो भक्त आहे. साईबाबांच्या दानपेटीत देशविदेशातील भाविकांकडून वर्षभरात चारशे कोटींहून अधिक दान शिर्डीतील श्री साईंबाबा संस्थानच्या दानपेटीत जमा होत आहे. तसेच साईबाबांच्या डोक्यावरील सुवर्णमुकुटांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून सोने चांदी रत्नजडित हि-यांचे अंदाजे एकोणीस मुकुट भाविकांकडून साईचरणी दान करण्यात आले आहे. सुरूवातीला रविवारी दि.९ जानेवारी रोजी अज्ञात दानशुर साईभक्ताने साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी ११०.५७० ग्रॅम वजनाचा १२ लाख ७० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबा संस्थानला दान स्वरुपात दिला.हा मुकुट अतिशय सुंदर नक्षीकाम केलेला आहे.यावेळी आपलं नांव न करण्याची विनंती या साईभक्ताने केली आहे.
सन २०२४ या वर्षातील साईभक्त डॉ. राजाराम कोटा यांनी २९ लाख रुपये किमतीचा अर्पण केलेला हा पहिला सुवर्ण मुकुट होता.त्यानंतर हा रविवारी हा दुसरा मुकुट अर्पण आला असून यापुर्वी मागील वर्षी जुलै महिन्यात आंध्रप्रदेश येथील साईभक्त श्री विटला यांनी १९ लाख रुपये किंमतीचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला आहे.यावर्षी आठ महिन्यांच्या कालखंडानंतर हा मुकुट साईचरणी अर्पण आला आहे.साईभक्त डॉ कोटा यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते शाल व श्री साईबाबांची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साईंबाबा संस्थानचे प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदीसह अधिकारीवर्ग व सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.
चुकीच्या मार्गानेच एवढा पैसा कामावला असणार
एवढं मुकुट दान केल्यापेक्षा गरिबांची.. एखादी वसतीतली घरं बनवून दिली असती…