Monday, October 20, 2025
Happy Diwali

दोस्त : कविता आणि काव्यकोडी

दोस्त : कविता आणि काव्यकोडी
कोकीळ कुहुकुहू गाणे गातो वसंत ऋतूची चाहूल देतो ‘पेरते व्हा’ सांगत पावशा येतो पावसाच्या सरी देऊन जातो रानात पावसाला चढतो जोर पिसारा फुलवून नाचतो मोर आकाशात घिरट्या घालती घारी उंदरांना त्यांची भीतीच भारी आवाजाची नक्कल पोपट करी माणसासारखी फुशारकी मारी कोंबडी, कबुतर, कावळा, चिमणी सारेच खेळतात आपल्या अंगणी पाखरे आपले असतात दोस्त त्यांच्यासोबत वेळ जाई मस्त पाखरांसाठी चला फुलवूया बागा पर्यावरणाची ते राखतात निगा

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड

१) हवेत गारवा, फुललेली फुले. पक्ष्यांची किलबिल, झाडही डोले. पूर्व दिशा येई, हळूहळू उजळून. वेळ सांगा कोणती, मन जाई फुलून? २) भगवंताच्या पूजेत, हिला स्थान मानाचे. दारी वृंदावन, शोभून दिसे हिचे, मानवाच्या आरोग्यास, उपकारक ठरते. कोणत्या वनस्पतीचे, लग्न लावले जाते? ३) थंडीला मुळीच, तो घाबरत नाही. अंगावर केस याच्या, भरपूर राही. बर्फाळ प्रदेशात, फिरे चहुकडे. लोकांच्या उपयोगी, कोण बरं पडे?

उत्तर -

१) पहाट २) तुळस ३) याक
Comments
Add Comment