सोलापूर : सोलापुरच्या कुमठा नाका परिसरातील म्हेत्रे वस्तीच्या पाठीमागील सोलगी नगर मध्ये मागील चार दिवसांपासून वानरांनी हैदोस घातला आहे. तीन वानर असून ते चार दिवस झाले याच नगरातील या घरावरून त्या घरावर उड्या मारत आहेत. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लहान मुलांना फिरणे मुश्किल झाल्याचे पाहायला मिळत आहे.ते वानर घरावरून खाली जमिनीवर आले तर कुत्रे त्यांच्या मागे लागत आहेत. त्यामुळे या वानरांचे कुत्र्यांपासून संरक्षण होणे सुद्धा महत्त्वाचे आहे.वानर काही तरी खाण्यासाठी नागरिकांच्या दारात येत आहेत, त्यामुळे ते घरात घुसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वन विभागाने नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देऊन वानरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.