मुंबई: नुकतेच अनेक बँकांनी सध्याच्या आणि नव्या खातेधारकांना आकर्षित करण्यासाठी नवी डिपॉझिट स्कीम सुरू केली आहे. यात जन स्मल फायनान्स बँकेने नवी एफडी स्कीम लाँच केली आहे. बँकेने लिक्विड प्लस फिक्स डिपॉझिट नावाने स्कीम लाँच केली आहे. या स्कीम अंतर्गत फिक्स डिपॉझिटवर बँक ८.७५ टक्के व्याजदर देत आहे.
बँकेच्या नव्या स्कीममध्ये फिक्स डिपॉझिट ७ दिवसांपासून १८० दिवसांसाठी करता येते. बँकेच्या माहितीनुसार या स्कीममध्ये कमीत कमी गुंतवणुकीची मर्याद १० लाख रूपये आहे. रिटेल डिपॉझिट्ससाठी ही मर्यादा १० लाख रूपयांपासून ते ३ कोटी रूपयांपर्यंत आहे. तर मोठ्या डिपॉझिटसाठी ३ कोटींपासून ते २०० कोटी रूपयांपर्यंकची मर्यादा ठरवण्यात आली आहे.
कालावधी एफडी वार्षिक
७-१४ दिवस – ६.७५ टक्के
१५-६० दिवस – ६.७५ टक्के
६१-९० दिवस – ६.७५ टक्के
९१-१८० दिवस – ६.७५ टक्के