Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजये बावळटा, तेव्हा शिवसेना पैशासाठी लढत होती का?

ये बावळटा, तेव्हा शिवसेना पैशासाठी लढत होती का?

बच्चू कडू यांनी संजय राऊतांना फटकारले

अमरावती : संजय राऊतांना (Sanjay Raut) अभ्यास न करता वक्तव्य करण्याची सवय पडलेली आहे. जेव्हा देशात भाजपा आणि काँग्रेस लढत होती तेव्हा शिवसेना (Shivsena) तिसरीच होती ना? मग ये बावळटा, तेव्हा शिवसेना पैशासाठी लढत होती का? असा थेट सवाल करत प्रहार’ संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी संजय राऊतांना फटकारले.

तसेच महाराष्ट्राच्या सातबारावर काय तुमचाच हक्क आहे का? लढण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. आमच्या तिसऱ्या आघाडीचा फायदा भाजपाला होईल की काँग्रेसला होईल ते तुम्ही कसं ठरवता? त्यामुळे अभ्यास न करता एखाद्या बावळट पोरासारखं बोलणं संजय राऊतांना शोभत नाही. त्यांनी जीभ सांभाळून बोलत राहावं असं म्हणत बच्चू कडू यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. तसेच आगामी निवडणुकीत शिंदे-फडणवीस यांच्याविरोधात तगडे उमेदवार देणार, अशीही घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता प्रहार’ संघटनेचे बच्चू कडू, ‘स्वाभिमानी शेतकरी’ संघटनेचे राजू शेट्टी तसेच ‘स्वराज्य’ संघटनेचे संभाजीराजे यांनी तिसऱ्या आघाडीचे आव्हान उभे केले आहे.

या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी ही नेहमी भाजपाला मदत करते अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावरुनच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत यांच्याकडे पुऱ्या महाराष्ट्राचा पीआर कार्ड नाही. संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे, त्यांची जहागीरदार नाही, असा घणाघात करत महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबुतीने देऊ. तसेच या महाशक्तीचा राज्यात मुख्यमंत्री दिसेल असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला.

आमची महाशक्ती पुऱ्या देशात आदर्श ठरेल, देशभरात आदर्श वाटेल असे राज्य उभे करु असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मजबूत उमेदवार देऊ व २८८ जागा पूर्ण लढवू,” अशीही घोषणा बच्चू कडू यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -