जाणून घ्या नेमके प्रकरण काय?
मुंबई : मुंबईतील धारावी (Dharavi) परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी धारावीमधील एका मशिदीचा (Dharavi Mosque) अवैध भाग पाडल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या गोष्टीला विरोध करण्यासाठी मुस्लिम समूदाय रस्त्यावर उतरले असून आंदोलनाला सुरुवात केली आहे. तसेच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली असल्यामुळे सध्या धारावीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळी मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी धारावी येथील ९० फूट रोडवरील २५ वर्ष जुनी सुभानिया मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी दाखल झाले. मात्र ही मशीद खूप जुनी आहे, त्यामुळे ती पाडू नये असे तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र तरीही बीएकसी कर्मचाऱ्यांनी त्या मशिदीचा अवैध भाग पाडल्यामुळे संतप्त जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
मशिदीचा अवैध भाग पाडल्यामुळे वाद पेटला असून घटनास्थळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.