चेन्नई : बांगलादेश विरुद्धात चेन्नई सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने आपल्या कारकिर्दीतले ५ वे शतक झळकावले. गिलने ११९ धावांची नाबाद खेळी केली. गिलच्या ११९ धावांच्या नाबाद खेळीनंतर भारताने बांगलादेशसमोर ५१५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
टीम इंडियाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात शुभमन गिलसह ऋषभ पंतने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या तीन विकेट पडल्यानंतर गिल आणि पंतने भारताचा डाव सावरला. टीम इंडियाने अवघ्या ६७ धावांमध्येच तीन विकेट गमावल्या होत्या.
त्यानंतर पंत आणि गिलने ४थ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी केली. शुभमन गिलचे हे कसोटी क्रिकेटमधील बॅक टू बॅक शतक आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत शतक झळकावले होते. गिलने या खेळीत १० चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार ठोकले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा टप्पाही पार केला.
गिलचे या वर्षामधील हे तिसरे कसोटीचे शतक आहे. यावर्षी तो क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनलाय. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी यावर्षी २-२कसोटी शतके झळकावली आहेत.
India vs Bangladesh: बांगलादेशविरुद्ध कसोटीत जसप्रीत बुमराहने रचला इतिहास