Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीय

‘माझा भाजपा प्रवेश हा गणपती बाप्पाबरोबर विसर्जित’

‘माझा भाजपा प्रवेश हा गणपती बाप्पाबरोबर विसर्जित’
आगामी विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार - एकनाथ खडसे

जळगाव : गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे देवेंद्रजी म्हणाले होते, मात्र माझ्या दृष्टीने आता भाजपा प्रवेश हा गणपती बाप्पाबरोबर विसर्जित झाला आहे, असे म्हणत आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार असल्याचे स्पष्ट केले. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.


जामनेर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जोरदार प्रचार करणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.


एकनाथ खडसे म्हणाले, मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी सदस्य आहे आणि यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय काम करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार आहे. अनेक वेळा जामनेर तालुक्यात माझ्या सभा झालेल्या असून मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

Comments
Add Comment