नेमकं कारण काय?
पुणे : पुणे (Pune News) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे प्रशासनाने दुरुस्तीच्या कामांसाठी पुढील दोन दिवसांसाठी पुण्याहून लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे (Railway) गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही रेल्वेचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार असून प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ ते २३ सप्टेंबर या काळात दौंड ते मनमाड स्टेशनदरम्यान असलेल्या राहुरी- पढेगाव स्थानकादरम्यान नॉन इंटरलिंकचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे पुण्याहून निघणाऱ्या १० रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. या कालावधी मनमाड किंवा दौंड बाजूला जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे.
कोणत्या गाड्या रद्द?
शनिवारी म्हणजे आज दादर- साईनगर शिर्डी एक्सप्रेस, निजामाबाद- दौंड, पुणे-हजूरसाहिब नांदेड, हजूरसाबिह नांदेड- पुणे एक्सप्रेस या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर रविवारी पुणे-हरंगुल एक्सप्रेस, हरंगुल-पुणे एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस, दौंड-निजामाबाद,जबलपूर-पुणे विशेष लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सोमवारी पुणे-हरंगुल एक्सप्रेस, पुणे-जबलपूर विशेष ट्रेन या रेल्वे रद्द केल्या आहेत.
कोणत्या रेल्वेचे मार्ग बदलण्यात आले ?
- जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेस : मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळामार्गे धावेल.
- पुणे-हजूरसाहिब नांदेड एक्स्प्रेस : दौंड-कुर्डुवाडी-लातूर-परळी वैजनाथ-परभणीमार्गे धावेल.
- हजूरसाहिब नांदेड-पुणे एक्स्प्रेस : परभणी-परळी वैजनाथ-लातूर-कुर्डुवाडी-दौंडमार्गे धावेल.
- वास्को दा गामा-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस : पुणे-लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी आणि मनमाडमार्गे धावेल.
- यशवंतपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस : दौंड-पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड आणि सुरतमार्गे धावेल.
- हजरत निजामुद्दीन-हुबळी एक्स्प्रेस : मनमाड – इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळा- पुणे-दौंडमार्गे धावेल.
- हजरत निजामुद्दीन – वास्को द गामा गोवा एक्स्प्रेस : मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळा-पुणेमार्गे धावेल.
- निजामाबाद-दौंड : परभणी-परळी वैजनाथ-लातूर-कुर्डुवाडी-दौंडमार्गे धावेल.
- दौंड-निजामाबाद : दौंड-कुर्डुवाडी-लातूर-परळी वैजनाथ-परभणी मार्गे धावेल.