Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीमुरबाड येथे २७ सप्टेंबर रोजी “मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना” मेळावा

मुरबाड येथे २७ सप्टेंबर रोजी “मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना” मेळावा

ठाणे : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना” सन२०२४-२५ या आर्थिक वर्षापासून या शासन निर्णयानुसार शा.नि.क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९०/व्यशि-३,दि.०९ जुलै २०२४ व शा.नि.क्र.कौविस-२०२४/प्र.क्र.११८/प्रशा-२, दि.०९ सप्टेंबर २०२४ सुरु झालेली आहे.

मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुरबाड येथे दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या मेळाव्याकरिता मुरबाड परिसरातील खाजगी आस्थापना येणार असून उमेदवार यांची मुलाखत घेणार आहेत. तरी या योजनेकरिता जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुरबाड चे प्राचार्य अनिरुध्द जव्हारकर यांनी केले आहे.

या योजनेकरीता उमेदवाराची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. :-

  • उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.
  • उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वीपास/ आयटीआय/ पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
  • उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
  • उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल. या विद्यावेतनाचे विवरण १. १२ वी पास- रु.६,०००/- प्रतिमाह विद्यावेतन, २. आय.टी.आय/ पदविका- रु. ८,०००/- प्रतिमाह विद्यावेतन, ३. पदवीधर / पदव्युत्तर- रु. १०,०००/- प्रतिमाह विद्यावेतन, अशा प्रकारे आहे.

या योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवारी (NAPS/MAPS) पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुरबाड चे प्राचार्य अनिरुध्द जव्हारकर यांनी कळविले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -