हिरवा चुडा, नाकात नथ, केसात गजरा माळलेल्या तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलंत का?
या अभिनेत्रीचे मोहकी फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.
या मराठमोळ्या बॉलीवूड अभिनेत्रीने हे पारंपारिक फोटोशूट केलं आहे.
तिने हे फोटो शेअर करताना ४९ वर्षे जुनं मराठी गाणं वापरलं आहे.
‘एक लाजरा न साजरा मुखडा…’ या गाण्यावर फोटो शेअर करणारी ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल.
तर ही अभिनेत्री म्हणजे चाहत्यांची लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकुर होय.
फोटोमध्ये तिच्या हातात हिरवा चुडा दिसतोय आणि नाकात मोत्याची नथ पाहायला मिळतेय.
मृणालचं मनमोहन हास्याने सर्वाना घायाळ केलं आहे.
मृणालच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.