उबाठाची ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था आमदार नितेश राणे यांचा घणाघात
- महाविकास आघाडीत उबाठा सेना हा सावत्र भाऊ
- खुर्ची सोडा स्टूलवर बसण्याची आली आहे वेळ
- लोकसभा निवडणुकीत उबाठाचा स्ट्राइक रेट सर्वात खराब होता
कणकवली : महाविकास आघाडीत उबाठा सेना हा सावत्र भाऊ झाला आहे. त्यामुळे उबाठाची ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था झाली आहे. दिल्लीत मुजरा करून सुद्धा मुख्यमंत्री पदाची चॉकलेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कोणच देत नाही. कितीही हाणा पण मला वाघ म्हणा अशी उद्धव ठाकरे यांची अवस्था झालेली आहे. काँग्रेस आणि तुतारी समोर कितीही नाक रगडले तरी उद्धव ठाकरेंना या जन्मात तरी मुख्यमंत्री पद मिळणार नाही. असा घणाघाती टोला भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना केली.
कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उबाठा सेनेवर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस समोर किती छाती फुगवली तरी महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस आणि तुतारीवाले उबाठाला चहा पण विचारत नाहीत. बसायला खुर्ची सोडा स्टूल वर बसण्याची वेळ उबाठावर आलेली आहे. त्यामुळे लायकी एवढेच तोंड उघडल्यास काँग्रेस उबाठाला सीटचे काही तुकडे देतील. कारण लोकसभा निवडणुकीत उबाठा स्ट्राइक रेट सर्वात खराब आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी लायकीत राहावं असाही सल्ला यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर टीका करताना गुजरात वर घसरणाऱ्या संजय राऊतला त्याचे मालक आणि मालकीण गुजरातला जातात, गुजरातींच्या लग्नात हजेरी लावतात. त्यांची ताटे उचलतात. नाच्याप्रमाणे मालकाचा मुलगा नाचतो हे माहीत आहे मात्र संजय राऊतला सोबत नेत नाहीत त्याची ओळख करून देत नाही. म्हणून संजय राऊत जळतो त्याला हे खटकते आणि त्यामुळे गुजरात्यांवर संजय राऊत टीका करत असल्याची ही मिश्किल टिका यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.