Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीJalna Accident : भीषण अपघात! जालना-बीड मार्गावर एसटी बस-ट्रकची जोरदार धडक; गाड्यांचा...

Jalna Accident : भीषण अपघात! जालना-बीड मार्गावर एसटी बस-ट्रकची जोरदार धडक; गाड्यांचा चक्काचूर

६ जणांचा मृत्यू, १८ प्रवासी जखमी

जालना : जालना येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालना ते बीड मार्गावर एसटी बस आणि ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Jalna Accident) झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास जालना वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसला मोसंबी फळाची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने समोरासमोर एकमेकांना धडकताच मोठा आवाज झाला. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, आयशर ट्रक भरधाव वेगात होता. एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात तो समोरून येणाऱ्या बसला जाऊन धडकल्यामुळे भीषण अपघात घडला. दरम्यान, या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून १८ प्रवासी जखमी झाले आहेत.

त्याचबरोबर किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच इतर जखमी व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -