Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीप्रवाशांचा होणार कोंडी मुक्त प्रवास! एलटीटी मुंबई-रक्सौल विशेष गाड्या सुरू

प्रवाशांचा होणार कोंडी मुक्त प्रवास! एलटीटी मुंबई-रक्सौल विशेष गाड्या सुरू

मुंबई : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि रक्सौल दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – रक्सौल विशेष (१८ सेवा)

०५५५८ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – रक्सौल विशेष प्रत्येक गुरुवारी दि. २६ सप्टेंबर पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित विशेष ट्रेन आता दि. २८ सप्टेंबरपर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (९ सेवा)

०५५५७ रक्सौल- लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई विशेष प्रत्येक मंगळवारी दि. २४ सप्टेंबरपर्यंत चालवण्यासाठी अधिसूचित विशेष ट्रेन आता दि. २६.नोव्हेंबरपर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (९ सेवा)

विशेष ट्रेन चालण्याचे दिवस, वेळ, संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक ०५५५७ च्या विस्तारित सेवांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग उद्यापासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू होईल.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. तसेच प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -