Monday, August 25, 2025

Mega block : ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक

Mega block : ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. २२.०९.२०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक (Mega block) परिचालीत करणार आहे.

ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत

मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४४ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीमी/सेमी फास्ट सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीमी/सेमी जलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकावर थांबतील आणि पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. मुलुंड स्थानकावर आणि नियोजित वेळेच्या १० मिनिटे उशिराने पोहोचेल.

ठाणे लोकल डाऊन धीम्या मार्गावर चालतील

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या सेवा वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील/सुटतील.

डाऊन धीम्या लाइनवर :

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.५३ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल हि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.०५ वाजता सुटेल.

अप धीम्या लाइनवर :

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण लोकल असेल जी कल्याण येथून सकाळी १०.२५ वाजता सुटेल.

ब्लॉकनंतरची पहिली लोकल परळ लोकल असेल ही ठाणे येथून सायंकाळी ०४.१७ वाजता सुटेल.

कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- कुर्ला आणि पनवेल- वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

डाउन हार्बर मार्गावर :

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल.

ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.४४ वाजता सुटेल.

अप हार्बर मार्गावर :

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.०५ वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.४५ वाजता सुटेल.

हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment