मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. हे रिचार्ज प्लान विविध किंमत आणि फायद्यांसह येतात.
येथे तुम्हाला आज अशा रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत. यात युजर्सला अनलिमिटेड कॉल, दररोज २ जीबी डेटा आणि बरंच काही मिळेल.
आज जिओच्या अशा रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत १९८ रूपये आहे. यात युजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळेल.
जिओच्या यया प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.
१९८ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला १४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. अशातच हा रिचार्ज प्लान फक्त अर्धा महिना सुरू राहील. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस मिळतील. तसेच १४दिवस ही सर्व्हिस सुरू राहील.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो. जिओने रिचार्ज डिस्क्रिप्शनमध्ये सांगितले की जिओ सिनेमा प्रीमियमला यात सामील करण्यात आलेले नाही.