मुंबई: हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवश अतिशय शुभ मानला गेला आहे. शास्त्रात या दिवसाबाबत अनेक मान्यता तसेच नियमही आहेत. या दिवशी काही कामे करणे वर्ज्य मानले जाते. जाणून घ्या शुक्रवारी काय करू नये.
शुक्रवारच्या दिवशी कोणालाही चुकूनही साखर उधार देऊ नये. या दिवशी साखर दिल्याने कुंडलीतील शुक्र ग्रह कमकुवत होतो आणि भौतिक सुखसुविधांमध्ये कमतरता येते.
जर तुम्ही घर-जमीन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर शुक्रवारी करू नका. शुक्रवारच्या दिवशी प्रॉपर्टी खरेदी करणे शुभ नसते. तसेच प्रॉपर्टीशी संबंधित कामे अथवा गुंतवणूक करू नये.
पैशाशी संबंधित व्यवहार शुक्रवारच्या दिवशी करू नयेत. या दिवशी पैशांची देवाणघेवाण केल्याने लक्ष्मी माता नाराज होते.
शुक्रवारच्या दिवशी स्त्री जातीचा अपमान करू नये. कारण हा दिवस लक्ष्मी मातेचा दिवस असतो. स्त्रीला लक्ष्मीस्वरूप मानले गेले आहे.
शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या पुजेदरम्यान चुकूनही तुळशीचा वापर करू नका.