नवी मुंबई : म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या लॉटरीनंतर आता सिडकोनेही नवी मुंबईत (CIDCO Lottery) तब्बल ४० हजार घरांसाठीची सोडत जारी केली. याबाबत अर्ज प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. अशातच म्हाडाप्रमाणे आता सिडको देखील घराच्या किंमती स्वस्त करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे नवी मुंबईत स्वत:चे घर घेऊ पाहणाऱ्यांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोने नवी मुंबईत काढलेल्या सोडत घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि नेरूळ या रेल्वे स्थानकांजवळ सिडकोची ही घरे असणार आहेत. तसेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सिडकोची ही बंपर लॉटरी काढणार आहे.