ठाणे : कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ची स्थापना करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५ ८ महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या या केंद्रांचे मा.पंतप्रधान यांच्या शुभहस्ते आज दुपारी १२.३० वा. ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या केंद्रांमधून मोफत कौशल्य विकास कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील जोशी बेडेकर महाविद्यालय, सतीश प्र कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, आर . जे . ठाकूर महाविद्यालय, श्रीमती सी. एच. एम. कॉलेज, जीवनदीप कॉलेज, इंदाला, इ. महाविद्यालयांचा सहभाग असून AI सारख्या अत्याधुनिक कौशल्याचा समावेश आहे.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा तसेच २० सप्टेंबर २०२४ रोजी मा. पंतप्रधान यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमास ठाणे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी यांनी तसेच तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने नजिकच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन स्थळी उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचेमार्फत करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळाच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे यांचेशी ०२२ -२५४२८३०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व अद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे.