Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे झळकणार एकत्र

दिवाळीत बॉक्स ऑफिसवर होणार डबल धमाका


रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित अजय देवगणच्या (Ajay Devgan) सिंघम अगेन (Singham Again) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सिंघम पहिला आणि दुसऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. हा सिंघम अगेन फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट असल्याने प्रेक्षकांच्या याकडे चांगल्याच नजरा लागल्या आहेत. सिंघम अगेन चित्रपट तगड्या स्टारकास्टमुळे प्रचंड चर्चेत आहे. सिंघम अगेन चित्रपटात अजय देवगण, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, करीना कपूर, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि विलनच्या भूमिकेत अर्जून कपूर झळकणार आहे. आता या स्टारकास्टमध्ये बॉलिवूडमधलं आणखी एक नाव जोडलं गेलंय.



चुलबुल पांडे आणि बाजीराव सिंघम येणार एकत्र


रोहित शेट्टीच्या कॉप युनिवर्समध्ये दबंग चुलबुल पांडेची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. अभिनेता सलमान खान (salman Khan) सिंघम अगेन या चित्रपटात कॅमिओ करणार आहे. बॉलिवूडचा दबंग उर्फ चुलबुल पांडे रोहित शेट्टीच्या चित्रपटात धमाका करायला तयार आहे. अजय देवगणचा सिंघम चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यंदाच्या दिवाळीत सिंघमसोबत डबल धमाका करण्यासाठी दबंग चुलबुल पांडेही झळकणार आहे.



रोहित शेट्टीच्या चित्रपटात सलमान खान


मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्पेक्टर चुलबुल पांडेच्या भूमिकेत सलमान खान कॅमिओ करणार आहे. सलमान खान सिंघम फ्रेंचायझीमध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टीने त्याच्या ॲक्शन चित्रपटाचा भाग होण्यासाठी सलमान खानला राजी केलं आहे. सिंघम अगेन चित्रपटात कॅमिओ भूमिका साकारण्यासाठी भाईजानने होकार दिला आहे.




सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 ची बॉक्स ऑफिसवर टक्कर


सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यनने हे टाळण्यासाठी रोहित शेट्टीला फोन करून चित्रपट पुढे ढकलण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. सिंघम अगेन १ नोव्हेंबर ऐवजी १५ नोव्हेंबरला रिलीज करू, असं कार्तिक आर्यनने म्हटलं होतं. दोन्ही चित्रपटांना याचा फायदा बॉक्स ऑफिसवर झाला असता. पण, आता रोहित शेट्टी सिंघम अगेन चित्रपट पुढे ढकलण्याच्या विचारामध्ये नसल्याचं दिसून येत आहे. १ नोव्हेंबरला सिंघम अगेन चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.





Comments
Add Comment

Dhurandhar 2:धुरंदरमध्ये 2 दिसणार हा अभिनेता..,प्रेक्षकांचा उत्साह वाढणार..

धुरंधर २: हिंदी चित्रपटसृष्टीत नुकताच प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी

अंगावर काटा येणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित, भूमी पेडणेकरची भूमिका थरकाप उडवणारी

मुंबई : सिरीयल किलरच्या कथांवर आधारित थ्रिलर नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. याच धाटणीतील एक नवी वेब सिरीज

Bigg Boss Marathi 6 :बिग बॉस मध्ये राधा पाटीलचा मोठा खुलासा; तीन वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिप कबुली

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी सीझन ६ मधील स्पर्धक व नृत्यांगना राधा पाटील सध्या बिग बॅासच्या घरात आणि बाहेरही चर्चेचा

रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा

रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा मुंबई :  छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि

२०२६ प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला (शनिवार/रविवार) ओटीटी वर येणारे प्रोग्राम

या प्रजासत्ताक दिनी, धैर्य, न्याय, ओळख आणि बदल दर्शविणाऱ्या कथा पुन्हा एकदा पाहून स्वातंत्र्याचा सन्मान करूया.

धुमधडाक्यात प्रसाद ओकच्या मुलगा साखरपुडा संपन्न; कोण आहे होणारी सून ?

गेल्या काही दिवसांपासून मराठी फ्लीट इंडस्ट्रीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रसाद