गोंदवल्याच्या रामाचे वैशिष्ट्य!

Share

अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार वाटते. या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की, त्याच्यापुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो. हेच काम विशेष महत्त्वाचे आहे; कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल. आपल्याला एखादा रोग झाला आहे असे समजले तरच मनुष्य त्यातून मोकळा होण्याच्या प्रयत्नाला लागेल; तसे, दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल. शरणागतावर कृपा करणे हे रामाचे ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडवीलच आणि त्याचे काम होऊन जाईल. चांगला वैद्य कोण? तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असे औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवितो, तसाच माझा राम आहे, म्हणून प्रत्येकाने त्याला एकवार तरी पाहावे असे मला मनापासून वाटते.

मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे, पण ते कुणाला? तर फक्त भगवंताच्या उपासकाला! भगवंताच्या उत्सवाला थोडे लोक जरी जमले, पण ते नामात राहणारे असले, तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे; म्हणून ते अगदी साधे असावे आणि तिथे उत्तम उपासना चालावी. मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे. म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगडमातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा.

भगवंताच्या इच्छेनेच सर्व चालले आहे ही भावना ठेवून, जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दु:ख करू नये. आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे. त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकविण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे. एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो, त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो. तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपाने राहातो. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे नि:संशय असते, त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते; भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे, तिच्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील, त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो, तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…

9 minutes ago

Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…

11 minutes ago

पहलगाममध्ये सात अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तीन अतिरेक्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…

49 minutes ago

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

1 hour ago

Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…

2 hours ago