मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये सुरू झाला आहे.
या सामन्यात भारताचा ऑलराऊंडर रवीचंद्रन अश्विनने शानदार शतक ठोकले आहे. तो पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद आहे.
अश्विनने पहिल्या डावात १०८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान अश्विनने जबरदस्त रेकॉर्डही केला.
अश्विन जगातील असा पहिला खेळाडू बनला आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५००हून अधिक विकेट घेतल्या आणि २० ठिकाणी ५०हून अधिक स्कोरही केला.
अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ५१६ विकेट घेतल्या आहेत. सोबतच त्याने १४ अर्धशतके आणि ६ शतके ठोकली आहेत.
याबाबतीत दुसऱ्या स्थानावर स्टूअर्ट ब्रॉड आहे. त्याने कसोटीत एकूण ६०४ विकेट घेतल्या आहेत. आणि १४ वेळा ५०हून अधिक धावा केल्या आहेत.