मुंबई: पंजाब किंग्सने रिकी पाँटिंगला मुख्य प्रशिक्षकपदी निवडले आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंसह प्रशिक्षकांनाही जबरदस्त सॅलरी मिळते. पाँटिंगला दिल्लीकडून ३.५ कोटी मिळत होते. दरम्यान, पाँटिंगला यावेळेस अधिक पगार मिळू शकतो.
आयपीएलमधील सर्वात महागड्या प्रशिक्षकाबद्दल बोलायचे झाल्यास तो गौतम गंभीर ठरू शकतो. एका रिपोर्टनुसार गंभीरला केकेआरकडून २५ कोटी रूपये मइळतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
गंभीर कोलकाताशी गेल्याच हंगामात सामील झाला आहे. त्याआधी तो लखनऊ सुपर जायंटसोबत होता. गंभीरच्या मार्गदर्शनाआधी लखनऊची दमदार कामगिरी झाली होती. त्यानंतर कोलकाताने चॅम्पियनशिपचा खिताब मिळवला होता.
रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्सच्या मार्क बाऊचरला २.३ कोटी रूपये सॅलरी मिळते. ते बऱ्याच काळापासू संघासोबत आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचे प्रमुख प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगला ३.५ कोटी रूपये मिळतात. फ्लेमिंग सीएसकेसोबत दीर्घकाळापासून आहेत.
अँडी फ्लावरबाबत बोलायचे झाल्यास त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ३.२ कोटी रूपये मिळतात.