मुंबई: भारतीय संघ आपल्याच घरात बांगलादेशविरुद्ध २ सामन्यांच्या कसोटी मालिका आजपासून खेळत आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरूवाच होत आहे.
मात्र या कसोटीआधी भारतीय चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर येत आहे. ही हवामानाबाबतची आहे. खरंतर, कसोटी सामन्यांत वरूणराजा चांगलाच बरसू शकतो. जर असे झाले तर सामन्याचा निकाल लागणे कठीण आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात सवाल असेल की कसोटी सामन्यांच्या दरम्यान पाचही दिवस पाऊस कोसळणार का?
Accuweather.com नुसार चेन्नईत गुरूवारी पावसाची शक्यता ४६ टक्के असेल. या दिवशी उच्च तापमान ३५ डिग्री सेल्सियस असेल. तर कमीत कमी तापमान २७ डिग्री असेल.
चेन्नई कसोटीतील पहिल्या २ दिवसांत पावसाची शक्यता
Accuweather.com नुसार सामन्याच्या पहिल्या दिवशी १९ सप्टेंबरला अधिक पावसाची शक्यता आहे. या दिवशी ४६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० सप्टेंबरला पावसाची शक्यता ४१ टक्के आहे. दिलासादायक बाब म्हणजे पुढील ३ दिवस पावसाची शक्यता अतिशय कमी आहे. शेवटचे तीन दिवस पावसाची शक्यता अनुक्रमे २५ टक्के, २४ टक्के आणि २५ टक्के राहील.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, आकाश दीप/मोहम्मद सिराज.