Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीजगातील ५० बेस्ट हॉटेलच्या यादीत भारतातील हे हॉटेल, एका रात्रीचा खर्च ऐकून...

जगातील ५० बेस्ट हॉटेलच्या यादीत भारतातील हे हॉटेल, एका रात्रीचा खर्च ऐकून व्हाल हैराण

मुंबई: भारतात ट्रॅव्हल आणि टूरिझ्मचे सेक्टर वेगाने वाढत आहे. याचे नुकतेच उदाहरण म्हणजे एका भारतीय हॉटेलने जगभरातील ५० बेस्ट हॉटेलच्या यादीत स्थान मिळवले आहे.

हे २०२४मध्ये ५० बेस्ट हॉटेलच्या यादीत स्थान मिळवणारे एकमेव भारतीय हॉटेल आहे. या लिस्टमध्ये या हॉटेलने ४३वे स्थान मिळवले आहे.

आम्ही ज्या हॉटेलबद्दल बोलत आहोत ते आहे राजस्थानातील सुझान जवाई हॉटेल. हे एक लक्झरी सफारी कँप हॉटेल आहे. सुझान जवाईच्या तीन शाखा आहे. हे राजस्थानच्या जवाई बंध, जैसलमेर आणि सवाई माधेपुर स्थित आहे.

सुझान जवाईमध्ये राहणाऱ्यांना कँपिंगसोबत वाईल्डलाईफची मजाही दिली जाते. येथे थांबणाऱ्या पर्यटकांना चित्त्यापासून ते जंगलात राहणाऱे इतर प्राणीही पाहायला मिळतात.

येथे पर्यटकांना लक्झरियस रुमच्या ऐवजी लक्झरियस कँपमध्ये थांबण्याची सोय केलेली असते. यात त्यांना विविध सोयीसुविधा मिळतात. सुजान जवाईमध्ये थांबण्यासाठी आधीच बुकिंग करावी लागते.

येथे २ रात्री थांबण्यासाठीची किंमत १,७२,००० रूपयांपासून ते २,५०,००० रूपयांपर्यंत असू शकते. येथे तुम्हाला कमीत कमी २ रात्रींचा स्टे करणे गरजेचे असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -