Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजसोलापुरात २५ सप्टेंबरला 'हाय वोल्टेज ड्रामा'; मुख्यमंत्र्यांना पाय न ठेवू देण्याचा मराठा...

सोलापुरात २५ सप्टेंबरला ‘हाय वोल्टेज ड्रामा’; मुख्यमंत्र्यांना पाय न ठेवू देण्याचा मराठा समाजाचा इशारा

सोलापूर : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे तीन दिवसापासून उपोषण सुरू आहे. परंतु अद्यापही राज्य सरकार त्यावर कोणताही तोडगा काढत नाही. त्यातच मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा २५ सप्टेंबर रोजी होम मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे २५ सप्टेंबर रोजी सोलापुरात येणार आहेत. परंतु जरांगे पाटील यांच्या उपोषणावर सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यास कुणालाही सोलापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे. यामुळे सोलापुरात २५ सप्टेंबरला नक्की काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी ३५ ते ४० हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे. या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा व्यवस्थित मिळतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा हा २५ सप्टेंबर रोजी होम मैदान येथे होणार आहे. हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागांना जबाबदारीचे वाटप करण्यात आलेले आहे. दिलेल्या जबाबदारी प्रमाणे प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी अत्यंत दक्षपणे पार पाडावी. तसेच या सोहळ्यात येणाऱ्या महिला लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबतची खात्री करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -