Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mumbai News : मुंबईत अग्नितांडव! अंधेरी लोखंडवाला परिसरात भीषण आग; परिसरात धुराचे लोट

Mumbai News : मुंबईत अग्नितांडव! अंधेरी लोखंडवाला परिसरात भीषण आग; परिसरात धुराचे लोट

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या लोअर परेल आणि घाटकोपर परिसरात आग लागल्याची घटना घडली होती. मुंबईतील हे आगीचे प्रकरण ताजे असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. आज सकाळी अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील एका बंगल्याला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र अद्यापही आगीचे कारण समोर आले नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील ग्राउंड-प्लस-वन-मजली ​​घरात आग लागली. आगीने भीषण रुप धारण केल्यामुळे बंगल्याचा तळ आणि पहिला मजला आगीमुळे प्रभावित झाला. त्यामुळे या बंगल्यातून दाट धूर निघत होते.


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वीज पुरवठा कंपनी, रुग्णवाहिका सिव्हिक वॉर्ड आणि मुंबई अग्निशमन विभागातील कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. दोन अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली.

Comments
Add Comment