Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीफक्त ७ रूपये देऊन मिळणार फास्ट इंटरनेट आणि कॉलिंग, BSNLचा हा आहे...

फक्त ७ रूपये देऊन मिळणार फास्ट इंटरनेट आणि कॉलिंग, BSNLचा हा आहे प्लान

मुंबई: देशात इतर टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवल्यानंतर बीएसएनएल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी दररोज विविध प्लान्स सादर करत आहे. सरकारी कंपनीने युजर्ससाठी फास्ट इंटरनेट सर्व्हिसची सुविधा आणली आहे.

नुकतेच जिओ, एअरटेल आणि वोडाफोनआय़डियाकडून रिचार्जच्या दरात वाढ करण्यात आली. त्यानंतर लाखो युजर्सनी आपला मोर्चा बीएसएनएलकडे वळवला आणि नंबर पोर्ट केला. युजर्सच्या मदतीसाठी आता कंपनीने ४जीची बेस्ट सर्व्हिस देण्याचा विचार केला आहे.

BSNLचा ५९९ रूपयांचा रिचार्ज

बीएसएनएलच्या या प्लानमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात लोकांना अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानअंतर्गत युजर्सला दररोज ३ जीबी डेटा मिळतो. या हिशेबाने पाहिल्यास युजर्सला दररोज ७.१३ रूपये लागतात. अशातच हा प्लान खूप स्वस्त ठरू शकता. असे यासाठी कारण यात ४ जी डेटा युजर्सला मिळतो.

कमी किंमतीत चांगले फायदे

युजर्सला हा प्लान खूप आवडत आहे. या प्लानअंतर्गत युजर्सला कमी किंमतीत चांगले फायदे मिळत आहेत. सेल्फकेअरसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. बीएसएनएलच्या सेल्फकेअर अॅपला तुम्ही प्लेस्टोरमधून डाऊनलोड करू शकता. हे अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर बीएसएनएल मोबाईल नंबरच्या मदतीने लॉग इन करू शकता. यासाठी फोनवर ओटीपी येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -