भारत हा जगातल्या सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि अन्नप्रक्रिया उद्योग आर्थिक विकासाला चालना देण्यात व अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. अभूतपूर्व वृद्धी आणि विकासाचा साक्षीदार देश राहिला असून गतिमान आणि वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्थेने चालीत वैश्विक शक्ती म्हणूनही तो उदयास आला आहे.
सरकारच्या प्रगतीशील धोरणात्मक उपक्रमांमुळे आणि हस्तक्षेपांमुळे, अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्राने अलीकडच्या वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली असून २०२२ -२३ला संपलेल्या आर्थिक वर्षात वस्तूनिर्माण क्षेत्रातील सकल मूल्यवर्धनात (GVA) ७.६६% आणि कृषी क्षेत्रातील सकल मूल्यवर्धनात ८.४५% योगदान दिले आहे.
भारत आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण कृषी संसाधनांसह जागतिक अन्न उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. दूध, भरडधान्ये, अन्न-धान्य, फळे, भाजीपाला, चहा आणि मासे यासारख्या अनेक खाद्यवस्तूंचा सर्वात मोठा उत्पादक असल्याने, अन्नप्रक्रिया उद्योगासाठी एक मजबूत पाया तयार केला गेला आहे. भारताची कृषी-अन्न निर्यात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४६.४ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचली. यातून या क्षेत्राची जलद वाढ आणि जागतिक प्रभाव अधोरेखित होतो. एकूण कृषी-अन्न निर्यातीत प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वाटा २०१४-१५ मधील ४.९० अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून २०२३-२४ मध्ये १०.८८ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत वाढला आहे.
भारताच्या अन्नप्रक्रिया क्षेत्रातील संधी मोठ्या आणि वैविध्यपूर्ण आहेत. प्रत्येक उप-क्षेत्र अभूतपूर्व वाढीची शक्यता प्रदान करते. तंत्रज्ञानातील प्रगतीसह या उद्योगातही क्रांतिकारी बदल घडले आहेत. यामुळे अन्न सुरक्षा, पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनात प्रगती शक्य झाली आहे. ई-कॉमर्समधील वाढ आणि तयार व सोयीस्कर खाद्यपदार्थांची म्हणजेच रेडी टू इट फूडची वाढती मागणी यामुळे वृद्धीसाठी आणखी नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. गुंतवणूकदार आणि उद्योजक दोघांसाठी हा उत्साहवर्धक कालावधी आहे.
अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने राबवलेल्या विविध योजना आणि पुढाकार परिवर्तनासाठी आणि एका मजबूत परिसंस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ही परिसंस्था सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांमध्ये नावीन्य, गुंतवणूक आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देते. यापैकी प्रमुख योजना प्रधानमंत्री किसान संपदा योजनेने शेतीच्या वेशीपासून ते रिटेल दुकानापर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापनासह आधुनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या प्रयत्नांमुळे केवळ काढणीनंतरचे नुकसान कमी झाले नाही, तर निर्यात क्षमताही लक्षणीयरित्या वाढली. याखेरीज उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना, भारताच्या अन्नप्रक्रिया उद्योगातल्या स्पर्धात्मकतेला आणि वाढीला चालना देण्यासाठीच्या प्रमुख प्रयत्नांचे एक द्योतक आहे. मंत्रालय देशातील सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांच्या स्थापनेसाठी किंवा ते आर्थिक, तांत्रिक आणि व्यावसायिक सहाय्य प्रदान करण्यासाठी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग औपचारिकीकरण योजनादेखील राबवत आहे.
वर्ल्ड फूड इंडिया : जागतिक अन्न विविधता म्हणून भारताचे दर्शन अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाची वर्ल्ड फूड इंडिया या कार्यक्रमाची संकल्पना जागतिक अन्नप्रक्रिया केंद्र बनण्यासाठीच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. हा वार्षिक कार्यक्रम अन्न मूल्य साखळीतील विविध घटकांतील भागधारकांना एकत्र आणून, ज्ञानाचे आदानप्रदान करण्यास चालना देण्यासाठी वैश्विक मंच पुरवतो आणि जागतिक अन्नप्रक्रिया महाशक्ती होण्याचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठीच्या दिशेने पुढे नेतो. हा बहुप्रतिक्षित महाकार्यक्रम १९ ते २२ सप्टेंबर २०२४ या कालावधीत भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल. मागील कार्यक्रमांचे यश पाहता, या वर्षीचा कार्यक्रम नेटवर्किंग आणि सहयोगासाठी अतुलनीय संधी उपलब्ध करून देणारा, व्यापक आणि अधिक प्रभावशाली करण्याचे नियोजन आहे. या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि भारताच्या प्रचंड अन्न बाजारपेठेचा व आर्थिक संधींचा लाभ घेण्यासाठी मंत्रालय, जागतिक गुंतवणूकदार, उद्योजक, अन्नप्रक्रिया कंपन्या, निर्यातदार, आयातदार, नवोन्मेषक आणि सरकारी प्रतिनिधी यांना आमंत्रित करत आहे.
वर्ल्ड फूड इंडिया २०२४ मध्ये पेट फूड(पाळीव प्राण्यांचे अन्न), होरेका (HoReCa-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरिंग) आणि पीक कापणी हंगामात लागणारी यंत्रे यांसह अनेक नवीन क्षेत्रांना समर्पित विशेष क्षेत्रे असतील. अन्न उद्योगाच्या उद्योन्मुख व्याप्तीचे प्रतिबिंब यातून पाहायला मिळणार असून नवोन्मेष आणि वैविध्यपूर्ण गुंतवणूक आकर्षित करणे, हा यामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमात उद्योग भागधारकांमध्ये ज्ञानाचे आदानप्रदान आणि सहयोग सुलभ करण्यासाठी आखलेल्या संकल्पना आधारित सत्रांची मालिका असेल. मुख्य विषयांमध्ये शाश्वत पॅकेजिंग तंत्रज्ञान, कचरा कमी करणे, मूल्यवाढ, अन्न आणि व्यापारात क्रांती घडवून आणणे, आदींचा समावेश आहे. आव्हानांना तोंड देण्यासाठी, सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी आणि शाश्वत वाढीसाठी धोरणे शोधण्यासाठी तज्ज्ञांना एक व्यासपीठ ही सत्रे प्रदान करतील. त्याचबरोबर रिव्हर्स बायर सेलर मीट आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि भारतीय विक्रेते यांच्यात थेट संवाद साधण्यास सक्षम करेल, बाजारपेठेत प्रवेश वाढवेल आणि नवीन भागीदारीला चालना देईल.
या व्यतिरिक्त वर्ल्ड फूड इंडिया समवेत भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे जागतिक अन्न नियामक शिखर परिषदेचे नियोजन करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा, गुणवत्ता आणि नवोन्मेष या संदर्भातील महत्त्वाच्या पैलूंचे निराकरण करण्यासाठी जागतिक अन्न नियामकांमध्ये सतत संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे, हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट्य आहे.
भारताच्या आर्थिक समृद्धीमध्ये योगदान देण्याबरोबरच लोकांचे कल्याण सुनिश्चित करणाऱ्या या गतिमान आणि लवचिक क्षेत्राला चालना देण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय वचनबद्ध आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…