मुंबई: जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटते आणि उलटी होऊ लागते. अनेकदा अपचनाच्या त्रासामुळे ही समस्या होते. अनेकांना प्रवासादरम्यान उलटी, मळमळ याचा त्रास होतो. माज्ञ तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उलटीसारखे वाटते का अथवा उलटी होते का? याचे उत्तर हो असेल तर तुम्हाला त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
या कारणामुळे उलटीसारखे जाणवते
चिंता-तणाव- जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचे टेन्शन असेल आणि त्यामुळे तुम्ही त्रस्त असाल. तसेच त्या गोष्टीबाबत सतत विचार करत आहात तर तुम्हाला सकाळी उठल्यावर उलटीसारखे जाणवू शकते.
लो ब्लड शुगर लेव्हल – जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी असेल तरीही सकाळी उलटी होण्यामागचे हे कारण असू शके. या स्थितीत रुग्णाला उलटीसोबत चक्करही येते.
मायग्रेन- जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर यामुळे सकाळी उलटी तसेच मळमळल्यासारखे होते. क्लस्टर डोकेदुखी हे उलटीसारखे वाटण्यामागचे कारण आहे. तसेच भूक लागल्यानेही लो ब्लड शुगर मायग्रेन डोकेदुखीचे कारण ठरू शकते.
डिहायड्रेशन – सकाळी उलटी होणे हे डिहायड्रेशनचे मुख्य कारण आहे. जर तुम्हाला सकाळी चक्कर आणि उलटी येत असेल तर तुम्ही पुरेसे पाणी प्यायले पाहिजे. यामुळे डिहायड्रेशन होणार नाही.