Monday, October 7, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकइंदिरानगर परिसरात एकाच कुटुंबातील तीन जणांची आत्महत्या

इंदिरानगर परिसरात एकाच कुटुंबातील तीन जणांची आत्महत्या

सिडको : इंदिरा नगर परिसरातील सराफ नगर लेन क्रमांक दोन मध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून घरात सुसाईड नोट आढळून आलेली नाही. नाशिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पती-पत्नी व नववर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे. विजय सहाने (३६) पत्नी ज्ञानेश्वरी सहाणे (३२), नात अनन्या अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार विजय सहाने हे एका खाजगी कर्मचारी कामाला होते. ते वडील माणिक सहाने व आई लिलाबाई यांच्या समवेत दुमजली प्रतिगंगा रो हाऊस क्रमांक एकमध्ये राहत होते. बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नात अनन्या शाळेत जाण्यासाठी खाली न आल्याने माणिक सहाने वरच्या मजल्यावर गेले. दरवाजा बंद असल्याने त्यांनी आवाज दिला बराच वेळ झाला तरी कोणीही दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी रो हाऊस सामोरील ओळखीच्या नागरिकांना मदतीसाठी बोलावले.

नागरिकांनी दरवाजा उघडण्यास प्रयत्न केला तरी दरवाजा उघडला नाही शेवटी दूध वाल्याने दरवाजा तोडला माणिक सहाने व नागरिकांनी खोलीत प्रवेश केला असता त्यांना तिघेजण मृत अवस्थेत दिसून आले.

घरात आरडाओरडा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ सहाणे यांच्या घराकडे धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांनी सोबत आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सहानी कुटुंब हे मूळचे गौळणे येथील आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास इंदिरा नगर पोलीस करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -