Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडीKangana Ranaut : कंगना राणौतच्या अडचणीत वाढ, चंदीगड कोर्टाने 'इमर्जन्सी' चित्रपटाला नोटीस...

Kangana Ranaut : कंगना राणौतच्या अडचणीत वाढ, चंदीगड कोर्टाने ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला नोटीस बजावली

चंडीगढ : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौतचा (Kangana Ranaut) त्रास काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्या कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर अनेक विघ्न येत आहेत. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात शिखांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत बुधवारी (१८ सप्टेंबर) दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे चंदीगड न्यायालयाने नोटीस बजावली आहे. अधिवक्ता रविंदर सिंग बस्सी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना चंदीगड जिल्हा न्यायालयाने ही नोटीस बजावल्याचे सांगण्यात येत आहे. ते ‘लॉयर्स फॉर ह्युमॅनिटी’ या एनजीओचे अध्यक्षही आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिवादींना ५ डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. बस्सी यांनी याचिकेत आरोप केला आहे की, कंगना राणौत आणि इतर प्रतिवादींनी ‘इमर्जन्सी’ चित्रपटात शिखांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: अकाल तख्तच्या माजी जथेदारांना ‘दहशतवादी’ म्हणून दाखवून ‘टार्गेट’ करण्यात आले आहे.

यासोबतच बस्सी यांनी याचिकेत आरोप केला आहे की, आरोपींनी इतिहासातील योग्य तथ्ये आणि आकडेवारीचा अभ्यास न करता शिखांबद्दल चुकीची संकल्पना मांडली आहे आणि शीख समाजाच्या जथेदारांवर चुकीचे आणि खोटे आरोपही केले आहेत. ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची अभिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शक यांनी अल्पसंख्याकांविरोधात भडकाऊ विधाने आणि भाषणे करून समुदायांमध्ये मतभेद निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अशा परिस्थितीत कंगना राणौत दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट वादात अडकला आहे. कारण शिरोमणी अकाली दलासह शीख संघटनांनी यावर समाजाची चुकीची माहिती देण्याचा आणि ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, सेन्सॉर प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्यानंतर मुंबईतील आपली मालमत्ता विकावी लागली, असे कंगनाने नुकतेच सांगितले.

Kangana Ranaut Mumbai Bungalow : ‘इमर्जन्सी’साठी कंगनाने मुंबईतील बंगला अवघ्या ३२ कोटींना विकला, पण पुढे काय?

याचिकाकर्त्याने भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम १९६ (१) (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषेच्या आधारावर विविध समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि १९७ (१) (भारताचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता) किंवा एखाद्या व्यक्तीची सुरक्षा धोक्यात आणणारी खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती तयार करणे किंवा प्रकाशित करणे), ३०२ (कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने मुद्दाम शब्द उच्चारणे) २९९ (कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावनांचा अपमान करणे) दुखापत करण्याच्या हेतूने रणौत आणि इतर दोन प्रतिवादींविरुद्ध हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -