Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडीJio Diwali Offers : जिओ फायबर वापरकर्त्यांना मिळणार दिवाळी धमाका; रिलायन्सने आणली...

Jio Diwali Offers : जिओ फायबर वापरकर्त्यांना मिळणार दिवाळी धमाका; रिलायन्सने आणली विशेष ऑफर!

मुंबई : इंटरनेट क्षेत्रात नावाजलेली रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) कंपनी सातत्याने ग्राहकांच्या सेवेसाठी नवनवीन सेवा उपलब्ध करुन देत असते. या कंपनीने ग्राहकांसाठी वायरलेस तंत्रज्ञान वापरून भारतभरात ‘जिओ एअर फायबर’ (Jio AirFiber) वायरलेस ब्रॉडबँड सेवा सुरू केली. अशातच अनेक कंपन्यांकडून सणासुदीच्या काळात विविध ऑफर उपलब्ध करुन दिल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर रिलायन्सने ग्राहकांसाठी दिवाळी सणासाठी एक विशेष ऑफर आणली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ग्राहकांसाठी ‘दिवाळी धमाका’ (Diwali Dhamaka) ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरद्वारे जिओ एअर फायबर वापरणाऱ्या सर्व युजर्सना एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे. सर्वात स्वस्त वार्षिक जिओ एअर फायबर (Jio AirFiber) प्लॅनची ​​किंमत लक्षात घेता किमान ७,१८८ रुपयांची ऑफर १९ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

ऑफरचा फायदा घेण्यासाठी नव्या ग्राहकांना काय करावे लागेल?

ही ऑफर सध्याच्या नवीन एअरफायबर ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. नवीन युजर्स Jio AirFiber साठी १२ महिन्याचे रिचार्ज कूपन मिळविण्यासाठी रिलायन्स डिजिटल किंवा माय जिओ स्टोअरमधून किमान २०,००० रुपयांची खरेदी करावी लागेल. फ्री सबस्क्रिप्शनसाठी ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, इतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती उपकरणे यांसारख्या उत्पादनांची खरेदी करावी लागेल.

तर, जिओ एअरफायबरच्या जुन्या ग्राहकांना २,२२२ रुपयांचे दिवाळी रिचार्ज आणि १२ महिन्यांचे एअरफायबर रिचार्ज कूपन दिले जाईल. हे कूपन नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वैध असतील. तसेच नवीन व आधीचे जिओ एअरफायबर युजर्स सहजपणे याचा लाभ घेऊ शकतात.

याशिवाय, प्रत्येक जिओ एअरफायबर्स कनेक्शनसह वापरकर्त्यांना ८०० पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि १२ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सदस्यतादेखील मिळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -