Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Pune Ganesh Visarjan : २७ तास उलटूनही पुण्यात मिरवणूका सुरूच; अनेक भागात वाहतूक कोंडी!

Pune Ganesh Visarjan : २७ तास उलटूनही पुण्यात मिरवणूका सुरूच; अनेक भागात वाहतूक कोंडी!

पुणे : पुण्यात अनंत चतुर्थदशीच्या दुसऱ्या दिवशीही गणपती विसर्जनची (Pune Ganesh Visarjan) मिरवणूक अद्यापही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. मानाच्या गणपती विसर्जन मंगळवारी झाल्यानंतर इतर गणपतीचे विसर्जन अद्यापही सुरू आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. साधारण २७ तास होऊन गेल्यानंतरही केळकर रोड, लक्ष्मी रोड, टिळक रोड येथे मिरवणूक अजून सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून लवकरात लवकर मंडळ पुढे काढण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत.



ऐकत नसलेल्या मंडळांना पोलिसांकडून चोप


अलका चौकाच्या पुढे सार्वजनिक गणेश मंडळ एका जागी थांबून डीजे वाजवत होते. त्यामुळे याठिकाणी वाहनांच्या लांब रांगा उभ्या राहिल्या असून पाठीमागून येणाऱ्या मंडळाची मोठी कोंडी झाली होती. तसेच या कोंडीचा परिणाम सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांवरही पडत होता. त्यामुळे ऐकत नसलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून चोप देण्यात आला. सध्या पुणे शहरात आतापर्यंत १७१ गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन झाले आहे.


दरम्यान, गेल्या वर्षी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मिरवणूक संपली होती. तर यंदाच्या मिरवणूका संपण्यासाठी अजून २ ते ३ तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही गणपती विसर्जन मिरवणुका उशिरापर्यंत चालणार असे चित्र पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment