Saturday, April 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजसाखळी बॉम्बस्फोटांनी पुन्हा हादरले लेबनान, पेजरनंतर आता रेडिओमध्ये स्फोट, ३ जणांचा मृत्यू

साखळी बॉम्बस्फोटांनी पुन्हा हादरले लेबनान, पेजरनंतर आता रेडिओमध्ये स्फोट, ३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: लेबनानमध्ये पेजरमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा साखळी बॉम्बस्फोट झाले आहेत. या त अनेक जण जखमी झाले आहेत. यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे स्फोट वायरलेस कम्युनिकेशनमध्ये झाले आहेत.

सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या कम्युनिकेशन डिव्हाईसमध्ये स्फोट झाले आहेत ते हातात पकडले जाणारे रेडिओ सेट वॉकी-टॉकी आहेत. हे स्फोट त्यावेळेस झाले जेव्हा हिजबुल्लाहच्या कमांडरनी ते हातात पकडले होते. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत.

हिजबुल्लाहने पेजर्सप्रमाणेच हे डिव्हाईसही साधारण पाच महिन्यांपूर्वी खरेदी केले होते. वरिष्ठ हिजबुल्लाह अधिकारी हाशेम सफीददीनने स्फोटाबद्दल सांगितले की सध्या संघटनेचा वाईट काळ सुरू आहे. मात्र याचा बदला घेतला जाईल. देशाच्या दक्षिण भागात आणि राजधानी बेरूतच्या दक्षिण उपनगरांमध्ये हे कम्युनिकेशन सेटमध्ये स्फोट झाले आहेत.

याआधी मंगळवारी लेबनान आणि सीरियामध्ये एकत्र अनेक शहरांमध्ये पेजर ब्लास्ट झाले होते. शेकडो संख्येने पेजरमध्ये साधारण एका तासांच्या आत अनेक स्फोट झाले होते. यात १२ लोक मारले गेले तर ४०००हून अधिक लोक जखमी झाले. या पेजर हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने इस्त्रायलवर गंभीर आरोप करताना म्हटले की, हा कट रचण्यामागे त्यांची गुप्त एजन्सी मोसाद आहे. हिजबुल्लाहने यावेळी बदला घेण्याची धमकी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -